scorecardresearch

Premium

कल्याण-डोंबिवलीत पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेत ३०० विद्यार्थी सहभागी

डोंबिवलीत बंदिस्त क्रीडागृहात, कल्याणमध्ये अत्रे रंगमंदिराच्या दुसऱ्या माळ्यावर कार्यशाळा घेण्यात आली.

workshop for making eco friendly ganpati idols in kalyan dombivli
डोंबिवलीत पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळेत सहभागी झालेले विद्यार्थी.

डोंबिवली– जलप्रदूषण रोखण्यासाठी न्यायालयाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वापरावर बंदी घातली आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचे महत्व विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून कळावे. घराघरांमध्ये पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा व्हावी, या उद्देशाने कल्याण डोंबिवली पालिका पर्यावरण विभाग, पर्यावरण दक्षता मंडळ, रोटरी क्लब कल्याण यांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळा घेतली. या उपक्रमात ३०० विद्यार्थी सहभागी झाले होते.

हेही वाचा >>> शिळफाटा रस्त्यावर सोनारपाडा, गोळवली भागातील पथदिवे बंद

NEET student committed suicide
नीट परीक्षार्थी विद्यार्थ्याची सातव्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या
Husband commits suicide
“तिला सुखरूप माहेरी जावू द्या…”, पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
CCTV pune
गणेशोत्सवात १८०० ‘सीसीटीव्ही’ कॅमऱ्यांची पुण्यावर नजर
ganesh murti
वर्धा : मोफत माती घेवून स्वतः तयार केलेली गणेश मूर्ती बसवा… पर्यावरणप्रेमी महिलांचा उपक्रम

डोंबिवलीत बंदिस्त क्रीडागृहात, कल्याणमध्ये अत्रे रंगमंदिराच्या दुसऱ्या माळ्यावर कार्यशाळा घेण्यात आली. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट, ईनरव्हिल क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट, ईनरव्हिल क्लब ॲाफ डोंबिवली वेस्ट, श्री लक्ष्मी नारायण संस्था या संस्थांचा या उपक्रमात सहभाग होता.

जैवविविधतचे संवर्धन आणि जल प्रदूषण रोखण्यासाठी प्रत्येक घटकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना जैवविविधता, पर्यावरण संवर्धन, जलप्रदूषण रोखणे याविषयीची माहिती, जागरुकता असावी, या विचारातून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळेचे कल्याण, डोंबिवलीत दोन दिवस आयोजन करण्यात आले. शाळकरी विद्यार्थी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते, असे पालिका पर्यावरण विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> कल्याणमध्ये गुंतवणूकदारांची वाढीव व्याजाच्या आमिषाने नऊ कोटीची फसवणूक

डोंबिवलीतील कार्यशाळेत ब्लॉसम, स. वा. जोशी शाळा, मंजुनाथ, मातोश्री सरलाबाई, टिळकनगर, कडोंमपा हायस्कूल, आदर्श हायस्कूल, स्वामी विद्यामंदिर गोपाळनगर, प्रकाश विद्यालयाचे २०० विद्यार्थी सहभागी झाले होते. अशाच पध्दतीने कल्याण मधील उपक्रमात विविध शाळांचे १०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.

पर्यावरण दक्षता मंडळाच्या रुपाली शाईवाले आणि सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शाडूच्या मूर्तीपासून पर्यावरणपूरक गणपती कसे बनवायचे, याची प्राथमिक माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने गणेश मूर्ती तयार केल्या. या कार्यक्रमाला घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 300 students participated in the workshop for making eco friendly ganpati idols in kalyan dombivli zws

First published on: 02-08-2023 at 17:20 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×