डोंबिवली : एकीकडे शहरे स्वच्छ व सुंदर रहावीत, यासाठी केंद्र सरकारकडून स्वच्छता अभियान राबविले जात असतानाच, दुसरीकडे डोंबिवली रेल्वे स्थानकात या अभियानाचे तीनतेरा वाजल्याचे दिसून येत आहे. येथील स्वच्छता गृहांमध्ये नियमित स्वच्छता करण्यात येत नाही. स्वच्छता गृहांची देखभाल केली जात नाही. यामुळे स्वच्छता गृहांमधील दुर्गंधीमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. काही स्वच्छतागृह तुंबली असल्याने तेथील निचरा फलाटावर होत आहे.

डोंबिवली रेल्वे स्थानक व्यवस्थापक, रेल्वे सुरक्षा बळ, लोहमार्ग पोलीस यांनाही या दुर्गंधीचा त्रास होत असताना तेही या विषयावर गप्प बसत असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाटांवर दररोज सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत स्वच्छतेची कामे करणाऱ्या ठेकेदारांच्या कामगारांना स्वच्छतागृहातील अस्वच्छता दिसत नाही का, असे प्रश्न प्रवासी करत आहेत. दररोज हजारो प्रवासी या स्थानकातून प्रवास करतात.

Chandrapur marathi news
चंद्रपूर : सफाई कामगार, शिल्पनिदेशक पदांसाठी ३५ हजारांची लाच, मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Garbage collection, pune , Garbage collection night ,
पुणे शहरात आता रात्रीही होणार कचरासंकलन, हे आहे कारण ?
Confusion due to incorrect announcements in running local trains
पुढील स्थानक ‘चुकीचे’! धावत्या लोकल गाड्यांमधील चुकीच्या उद्घोषणांमुळे संभ्रमावस्था
emergency qr code on vehicles loksatta
नागपूर : अपघातग्रस्ताची ओळख करून देणार ‘क्यू आर कोड’, तात्काळ उपचारासाठी…
Car Cabin Bad Smell
तुमच्याही गाडीमध्येही सतत घाणेरडा दुर्गंध येतो? मग एका स्वस्तातल्या सोप्या उपायाने गाडी आतून होईल फ्रेश
Committee to investigate Eklavya School case takes note of student protest
एकलव्य शाळेतील प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती, विद्यार्थी आंदोलनाची दखल
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री

हेही वाचा : हे व्हीआयपी कल्चर आम्हाला मान्य नाही; खासदार श्रीकांत शिंदे यांची भूमिका

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोन वर दिवा बाजुच्या दिशेला असलेले स्वच्छतागृह तुंबले आहे. महिला प्रवाशांचा डबा या स्वच्छतागृहाजवळ येतो. त्यामुळे महिलांना सर्वाधिक दुर्गंधीला सामोरे जावे लागते. तीन आणि चार क्रमांकाच्या फलाटावर कल्याण बाजुला असलेली स्वच्छतागृहे अनेक महिने बंद आहेत. या दिशेला फलाटावरील प्रवाशांना दिवा बाजुकडील स्वच्छतागृहात यावे लागते. फलाट क्रमांक पाचवरील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे.

हेही वाचा : पोलिसांच्या अतिउत्साहामुळे मुख्यमंत्र्यांच्या घरासमोरील रस्ता बंद; पोलिसांनी खापर मात्र खासदार श्रीकांत शिंदेवर फोडले

फलाटांवरील दुर्गंधीमुळे प्रवाशांना डोंबिवली पूर्व, पश्चिम बाजुला रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या स्वच्छतागृहांमध्ये जावे लागते. मुंबईतून लोकलने एक ते दीड तासाचा प्रवास करून आलेले प्रवासी डोंबिवली रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृहात जातात. त्यावेळी त्यांना तेथील तुटलेले बेसीन, पाण्याचा अभाव, दुर्गंधी, कचरा असे चित्र दिसते. स्वच्छतागृहांमध्ये पुरेसे पाणी नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. कल्याण रेल्वे स्थानकातील सर्व स्वच्छतागृहांची योग्यरितीने देखभाल केली जाते. मग डोंबिवलीची स्वच्छतागृहांकडे प्रशासन दुर्लक्ष का करते, असे प्रश्न प्रवासी करत आहेत.

Story img Loader