डोंबिवली – हवा प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई उच्च न्यायालयाने कठोर आदेश दिले आहेत. पालिका, पोलीस, वाहतूक सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. परंतु, डोंबिवली एमआयडीसी परिक्षेत्रात धूळ नियंत्रणासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या डोंबिवली विभागाकडून प्रभावी उपाययोजना केल्या जात नसल्याच्या तक्रारी स्थानिक रहिवाशांनी केल्या आहेत. धुळीमुळे सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढत असल्याच्या तक्रारी आहेत.

एमआयडीसी भागात काँक्रीटचे रस्ते झाले असले तरी या रस्त्यांवर कामे सुरू असताना पूर्ण क्षमतेने पाणी मारले नाही. ही रस्ते कामे पूर्ण झाल्यानंतर हे रस्ते पाण्याने धुऊन काढणे आवश्यक होते. ही कामे रस्ते ठेकेदाराने केली नाहीत. संध्याकाळच्या वेळेत हवा कुंद झाली की या भागात धुळीचे धुरके तयार होतात. रस्त्यांच्या भागातील सोसायट्या, बंगल्यांमध्ये धुलीकण उडत असल्याने रहिवासी हैराण आहेत.

Thieves stole gold ornaments and ₹55,000 cash from an elderly woman at Navsha Maruti temple
शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीचे सत्र कायम, सिंहगड रस्ता, कोंढवा भागातील घटना
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Rakesh Mutha hair burnt in kalyan west
कार्यकर्त्यांचा अतिउत्साह उमेदवाराच्या अंगलट आला; फटाक्यांच्या ठिणगीमुळे उमेदवाराचे केस जळाले
Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Maharashtra Elections Assembly Elections 2024 Election Commission
महाराष्ट्र वाहून जाणार की आपली वेगळी वाट आखणार?
farmer suicide sharad pawar
राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय गंभीर – शरद पवार
minister abdul sattar Attempt to grab industrial plots
शिक्षण संस्थेच्या नावाखाली औद्योगिक भूखंडावर डोळा, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या खेळीस अधिकाऱ्यांच्या सजगतेमुळे चाप

हेही वाचा – डोंबिवलीतील सुनीलनगरमध्ये रस्त्याच्याकडेचे झाड तोडल्याने नाराजी, रहिवाशांबरोबर पर्यावरणप्रेमींमध्ये संताप

डोंबिवली एमआयडीसीतील रिजन्सी अनंतम समोरील सेवा रस्ता ते मानपाडा रस्त्यापर्यंतच्या सेवा रस्त्यांची चाळण झाली आहे. या रस्त्यांवरून इतर वाहनांबरोबर आता केडीएमटी, नवी मुंबई परिवहन सेवेच्या बसही धावत आहेत. सेवा रस्त्यांची डागडुजी करणे हे एमआयडीसीचे काम आहे. तरीही ते रस्त्यांकडे लक्ष देत नसल्याच्या तक्रारी आहेत. डोंबिवली जीमखाना रस्ता, एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यांवर धुळीचे लोट उडतात. धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी एमआयडीसीकडून रस्त्यांवर पाणी, फवारे किंवा प्रतिबंधासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचे रहिवाशांनी सांगितले.

पालिकेकडे तक्रारी

डोंबिवली एमआयडीसीत धूळ नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिक कल्याण डोंबिवली पालिकेकडे तक्रारी करून एमआयडीसीत धूळ नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत. पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी पालिका हद्दीतील सर्व शासकीय यंत्रणांना धूळ नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. डोंबिवली एमआयडीसीत अशी कोणतीही कार्यवाही होत नसल्याच्या तक्रारी पालिकेत येत असल्याने पालिकेने आयुक्त डाॅ. इंदूराणी जाखड यांच्या आदेशावरून एमआयडीसीला धूळ नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यासाठी पत्र पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

“धूळ नियंत्रणासाठी आम्ही एमआयडीसी हद्दीतील रस्त्यांवर पाणी, फवारे मारणे आणि आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत.” – शंकर आव्हाड
कार्यकारी अभियंता, एमआयडीसी, डोंबिवली.

“पालिका हद्दीतील सर्व शासकीय यंत्रणांनी धूळ नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे आदेश आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी दिले आहेत. या आदेशाप्रमाणे एमआयडीसी कार्यालयालाही त्यांच्या अखत्यारितील धुळीचे रस्ते, निर्माणाधीन रस्त्यांवरील धूळ नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याचे सूचित केले जाणार आहे.” – रोहिणी लोकरे, कार्यकारी अभियंता, प्रदूषण नियंत्रण विभाग, कडोंमपा.

हेही वाचा – ठाणे : डुबी रेती व्यवसायाचे यांत्रिकीकरण करू नका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रेती व्यवसायिकांची मागणी

“एमआयडीसीत रस्ते काँक्रीटचे झाले तरी रस्ते पाण्याने साफ न केल्याने, सेवा रस्त्यांवरील खड्डे न बुजविल्याने धुळीचा त्रास आम्हाला सहन करावा लागतो. शाळकरी मुले, वृद्ध धुळीने सर्वाधिक त्रस्त आहेत.” – रेश्मा जोशी, रहिवासी.

“धूळ नियंत्रणासाठी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. मग, डोंबिवली एमआयडीसीतील अधिकारी सुस्त का आहेत. त्यांना न्यायालयाचा आदेश लागू नाही का.” रेवती अमृतकर, रहिवासी.