ठाणे : मतदानाचा टक्का वाढावा तसेच दिव्यांग आणि ८५ वर्षावरील नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ज्या ज्येष्ठ आणि दिव्यांग व्यक्तींना आजारपणामुळे घराबाहेर पडता येत नाहिये, अशा नागरिकांसाठी ही सुविधा असून जिल्ह्यातील ९३३ नागरिकांनी गृह मतदानासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केले आहेत. जिल्ह्यात गृह मतदानास आज पासून सुरुवात होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघाला गृह मतदानासाठी वेगवेगळा दिवस ठरविण्यात आला असून मतदानाच्या दोन दिवस अगोद पर्यंत गृहमतदार सुरु राहणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा निवडणूक विभागाकडून देण्यात आली.

दिव्यांग व्यक्ती तसेच ८५ वर्षावरील काही ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडून मतदान करणे शक्य होत नसते. यामुळे गेल्या काही निवडणूकांमध्ये मतदानाचा टक्का घसरल्याचे दिसून आले होते. परंतू, मतदानाचा टक्का वाढावा यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. मतदान जनजागृतीसह दिव्यांग आणि ८५ वर्षावरील नागरिकांना घर बसल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूकीमध्येही गृह मतदान पार पडले. याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानुसार, विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देखील गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात आज पासून मतदानाला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात ९५ हजार १२५ दिव्यांग आणि ८५ वर्षावरील नागरिकांचा समावेश आहे. यातून ९३३ नागरिकांचे गृह मतदानासाठी निवडणूक विभागाकडे अर्ज प्राप्त झाले आहेत. यात, भिवंडी ग्रामीणमधील ८५, कल्याण पश्चिम ४०, अंबरनाथ ८५, कल्याण पूर्व ३८, ओवळा-माजिवडा ६६, मुंब्रा कळवा २३, कल्याण ग्रामीण ३४ दिव्यांग आणि ८५ वर्षावरील नागरिकांचा समावेश आहे. तर, उर्वरित ५६२ नागरिक हे इतर मतदार संघातील आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली. आज पासून या मतदानाला सुरुवात होणार असून मतदानाच्या दोन दिवस अगोदर पर्यंत गृह मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.

thane district senior citizen home voting
ठाणे जिल्ह्यात गृहमतदानाला सुरुवात
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
thane model code of conduct crime loksatta news
आचारसंहिता भरारी पथकाचीच खंडणीखोरी, शेतमालाच्या पैशांवर डल्ला, १३ दिवसांनंतर गुन्हा दाखल
Sanjay Raut
Sanjay Raut : “महायुतीला जिंकवण्यासाठी पोलीस व गुंडांच्या बैठका”, राऊतांचे आरोप; यादी देण्यास तयार, वरिष्ठ अधिकाऱ्याला म्हणाले, “सरकार बदलल्यावर…”
thane vidhan sabha campaign
निवडणूक प्रचारासाठी ठाण्यात ९४ रथांना परवानगी
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
sada sarvankar marathi news (1)
“उद्धव ठाकरेंसारखा माणूस राजकारणात सापडणार नाही”, सदा सरवणकरांच्या नावाने पोस्ट व्हायरल; स्वत: स्पष्टीकरण देत म्हणाले…

हेही वाचा : निवडणूक प्रचारासाठी ठाण्यात ९४ रथांना परवानगी

काय आहे गृह मतदानाची प्रक्रिया

४० टक्के अपंगत्व आणि ८५ वर्षावरील वृध्द यांच्याकरिता भारत निवडणूक आयोगामार्फत १२ डी नमुना अर्ज उपलब्ध करुन देण्यात आला होता. त्यापैकी प्राप्त झालेल्या अर्जांवर निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, मंजूर अर्जांच्या यादीनुसार विधानसभानिहाय मतदारसंघाद्वारे ८५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या आणि दिव्यांग मतदारांच्या घरी जावून त्यांचे मतदान घेतले जाणार आहे.

Story img Loader