कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील मलवाहिन्या अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून सफाई कामाचे तीन वर्षाचे कंत्राट मे. ग्रॅविट इंजिनिअर्स वर्क्स कंपनीला देण्यात आले आहे. ही कंपनी हे काम योग्यरितीने करत नसून या कंपनीने निविदा अटीशर्तींचा भंग केला आहे, अशी तक्रार स्पर्धक कंपनी आणि एका जागरूक नागरिकाने पालिका आयुक्तांकडे केली होती. या प्रकरणाच्या चौैकशीत अतिरिक्त आयुक्तांना त्रृटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पवार, याच विभागाचे कार्यकारी अभियंता राजू राठोड यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.

या नोटिसांना या दोन्ही अभियंत्यांनी सात दिवसाच्या आत उत्तर द्यावयाचे आहे. याबाबतचे स्पष्टीकरण वेळेत दिले नाहीतर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त डाॅ. जाखड यांनी दिला आहे. मे. ॲकाॅर्ड वाॅटर टेक कंपनी, माहिती कार्यकर्ते कौस्तुभ गोखले यांनी मे. ग्रॅवीट इंजिनिअर्स कंपनीच्या कामाबद्दल तक्रारी केल्या होत्या. यापूर्वी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी याप्रकरणाची चौकशी केली होती. तो अहवाल लालफितीत होता. तक्रारदारांच्या तक्रारींची सखोल चौकशी करण्याचे आदेश आयुक्त डाॅ. जाखड यांनी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांना दिले होते. याप्रकरणाची चौकशी करताना मे. ग्रॅविट कंपनीला मलवाहिन्या सफाईचे काम देताना यांत्रिकी विभागाने अनेक अनियमितता केल्या असल्याचे अतिरिक्त आयुक्त गायकवाड यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.

two youths molested young woman in ​​Kalyan arrested
कल्याणमध्ये तरूणीची छेड काढल्याने,दोन गटात हाणामारी
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Suicide Kalyan-Dombivli,
११ वर्षाच्या मुलाची प्रेमप्रकरण उघड झाल्याने आत्महत्या, कल्याण- डोंबिवलीत २ आत्महत्या
Kalyan Dombivli Municipalitys Junior Prosecutor and Laboratory Assistant suspende for accepted bribe
ठेकेदाराकडून लाच स्वीकारणारा कल्याण-डोंबिवली पालिकेचा कनिष्ठ अभियंता निलंबित
construction of illegal building near kdmc h ward office
कडोंमपाच्या ह प्रभाग कार्यालयाजवळ बेकायदा इमारतीची उभारणी; सामासिक अंतर न सोडल्याने परिसरातील सोसायटीतील रहिवासी अस्वस्थ
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Dombivli, Thakurli, laborer robbed Thakurli,
डोंबिवली : ठाकुर्लीतील ९० फुटी रस्त्यावर चाकूचा धाक दाखवून मजुराला लुटले
yuvasena s dipesh mhatre
कडोंमपाच्या नाममुद्रेचा दिपेश म्हात्रेंनी गैरवापर केल्याची भाजपची आयुक्त डॉ. जाखड यांच्याकडे तक्रार; कायदेशीर कारवाईची मागणी

हेही वाचा : ठाण्यात बेकायदा नळजोडण्यांविरोधात मोहिम, मुंब्रा आणि दिव्यात ९७ बेकायदा नळजोडण्या तोडल्या

मे. ग्रॅविट इंजिनिअरिंग वर्क्स कंपनीला मुंबई महापालिकेने दिलेल्या कामाच्या प्रमाणपत्राची अधिकृतता तपासण्यात आली नाही. शासन निर्णयानुसार ठेकेदाराने यापूर्वी मुंबई पालिकेत केलेल्या कामाच्या व्याप्तीची माहिती यांत्रिकी विभागाने घेणे आवश्यक होते. त्याकडेही यांत्रिकी विभागाने दुर्लक्ष केले, असा ठपका अतिरिक्त आयुक्तांनी अहवालात ठेवला आहे.

मे. इग्नि क्लिनिंग सर्व्हिसेस यांनी मे. ग्रॅविट कंपनी बरोबर केलेला एक करार (हिरींग ॲग्रिमेंट) मे २०२३ मध्ये रद्द केला आहे. ही माहिती मे. इग्नि कंपनीने पालिकेला कळवुनही अभियंता पवार, राठोड यांनी ती माहिती प्रशासनाला दिली नाही. मे. ग्रॅविट कंपनीला काम देताना निविदा समितीची बैठक झाली होती का, वाहनाच्या प्रात्यक्षिकासाठी कंपनीला पत्र देण्यात आले होते. त्यानंतर आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे निविदा समितीची पुन्हा बैठक घेतली होती का, असे अनेक प्रश्न नस्तीमध्ये अनुत्तरीत आहेत, असे अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा : मुरबाडमध्ये महायुतीतच एकमेकांवर कुरघोडी, भाजप शिवसेनेकडून एकमेकांच्या पदाधिकाऱ्यांची फोडाफोडी

चौकशी अहवाल गायकवाड यांनी आयुक्त जाखड यांना सादर केला. आयुक्तांनी अहवालाप्रमाणे यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पवार, राजू राठोड यांनी कार्यालयीन शिस्तीचा भंग केला आहे. या गैरवर्तनाबाबत महाराष्ट्र नागरी सेवा व शिस्त नियमाने पवार, राठोड यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. हे खुलासे समाधानकारक नसल्यास या दोन्ही अभियंत्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. मागील २० वर्षाहून अधिक काळ पवार, राठोड हे यांत्रिकी विभागात कार्यरत असल्याचे समजते.