स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मागील तीन दिवसांपासून ठाणे शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर डॉग्ज वर्ल्ड इंडिया आणि पापा पॉसम यांच्या वतीने आज स्वातंत्र्य दिनी ‘पेट परेड’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या फेरी मध्ये १०० पाळीव श्वान, विविध प्रजातींच्या १५ मांजरी, पक्षी आणि घोडे यांचा समावेश होता. यात सहभागी सर्व प्राण्यांना स्वातंत्र्याची ७५ वर्ष असा लोगो असलेले टी-शर्ट त्यांना परिधान करण्यात आले होते. ठाण्यातील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ते खेवरा सर्कल या मार्गावर सकाळी ९ वाजता काढण्यात आलेली ही ‘पेट परेड’ सर्व ठाणेकरांचे लक्ष वेधून घेत होती.

देशातील सर्व राज्यांमध्ये यंदा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत ठाणे जिल्हा प्रशासनातर्फे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे तसेच मॅरेथॉन, शालेय विद्यार्थ्यांच्या प्रभातफेऱ्या स्वातंत्र्यविरांचे माहिती प्रदर्शन, ऐतिहासिक स्थळांचे सुशोभीकरण, विविध मान्यवरांच्या मुलाखती यांसारख्या नानाविविध उपक्रम सबंध जिल्ह्यात सुरू आहेत. या कार्यक्रमांमध्ये डॉग्ज वर्ल्ड इंडिया आणि पापा पॉसम यांच्या वतीने आज स्वातंत्र्य दिनी आयोजित करण्यात आलेल्या ‘ पेट परेड ‘ या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ठाण्यातील डॉ.काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ते खेवरा सर्कल या मार्गावर सकाळी ९ वाजता काढण्यात आलेली ही ‘पेट परेड’ सर्व ठाणेकरांचे लक्ष वेधून घेत होती. पाळीव प्राण्यांच्या या फेरी मध्ये १०० पाळीव श्वान, विविध प्रजातींच्या १५ मांजरी, पक्षी तसेच काही घोड्यांचा देखील यात समावेश होता. यात सहभागी झालेल्या सर्व प्राण्यांना स्वातंत्र्याची ७५ वर्ष असे चिन्हं असलेले कपडे परिधान करण्यात आले होते. तर सर्व पाळीव प्राण्याचे मालक आपल्या प्राण्यासह हाती राष्ट्रध्वज घेऊन सहभागी झाले होते. यात रंगीबिरंगी कपडे घातलेले श्वान सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. तर पिंजऱ्यातील विविध पक्षी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. या फेरीमध्ये पाळीव प्राण्यांना विष्ठा करण्याकरिता रस्त्यावर आणु नये या बाबत प्राण्याच्या मालकांमध्ये जनजागृती करण्यात आली. या उपक्रमाला ठाण्यातील अनेक प्राणी प्रेमींनी मोठा प्रतिसाद दर्शविल्याचे डॉग्ज वर्ल्ड इंडियाचे प्रमोद निंबाळकर यांनी सांगितले.