मुंब्रा येथे मेफेड्रॉन (एमडी) या अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी आलेल्या दोन जणांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. त्यांच्याकडून १०७ ग्रॅम वजनाचा एमडी हा अंमली पदार्थ, एक बंदूक, नऊ जिवंत काडतुसे आणि तीन चॉपर असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अभिषेककुमार महतो(३२) आणि विजय मडे(२०) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून ते दिवा भागात राहतात.

हेही वाचा- ठाणेकरांनो सावधान!; बसमध्ये मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले

आरोपी अभिषेककुमार हा खुनाच्या आरोपाखाली आठ वर्ष तुरुंगात होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. हे दोघे मुंब्रा येथील वाय जंक्शन येथे शुक्रवारी अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे ३ लाख २१ हजार रुपये किमतीचा १०७ ग्रॅम वजनाचा एमडी हा अंमली पदार्थ, १ बंदूक, ९ जिवंत काडतुसे आणि एक चॉपर अशी शस्त्रास्त्र आढळून आली.

हेही वाचा- विश्लेषण: लहरी हवामानाच्या ठाणे जिल्ह्यात एकही वेधशाळा का नाही? खासगी हवामान अभ्यासकांसमोर कोणत्या समस्या?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिषेककुमार याच्या घराचीही पोलिसांनी झडती घेतली असता, त्याच्या घरातून पोलिसांना आणखी दोन चॉपर आढळून आले, असा एकूण ४ लाख २३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी दोघांकडून जप्त केला आहे. या दोघांकडे अंमली पदार्थाचा साठा कुठून आला आणि ते तो कुणाला विकणार होते, तसेच प्राणघातक शस्त्रेही त्यांच्याकडे कुठून आली आणि या शस्त्रांचा वापर करत त्यांनी कोणते गैरकृत्य केले आहे का ? याबाबत पोलीस तपास करीत आहेत.