– पदाधिकाऱ्यांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांची भेट घेऊन दिले निवेदन

ठाणे : गेल्या तीन महिन्यापासून पक्षाशी गद्दारी करून झालेल्या सत्तांतरानंतर ठाणे जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर व शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करून अडकविण्याचे काम सध्या सुरू असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला असून या संदर्भात त्यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची गुरुवारी भेट घेऊन निवेदन दिले. शिवसैनिकांवर होणाऱ्या दडपशाहीला आळा घाला, अन्यथा न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा >>> ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड ; महापालिकेवर सुमारे १४ कोटी इतका अतिरिक्त भार पडणार

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ठाणे जिल्हा पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यावेळी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, शिवसेना प्रवक्ते चिंतामणी कारखानीस, शिवसेना उपनेत्या अनिताताई बिर्जे, ठाणे जिल्हा प्रमुख व महिला आघाडी समिधाताई मोहिते, महिला उप जिल्हा प्रमुख रेखा खोपकर, महेश्वरी संजय तरे, आणि इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या परंपरेनुसार तलावपाली येथील मध्यवर्ती शाखेमध्ये १४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री ध्वजारोहणाचा सोहळ्यास असंख्य निष्ठावंत शिवसैनिक मोठ्या संख्येने आले होते. परंतु फुटीर गटाकडून चितावणी होत असताना सुद्धा आम्ही संयम दाखवल्यामुळे आणि कायदा सुव्यवस्थेची जाण ठेवून संघर्ष टाळला.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील भागशाळा मैदानातील उत्सवी कार्यक्रमांना नागरिकांचा विरोध ; स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

त्यानंतर मनोरमा नगर येथे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या वाचनालयाचे नामफलक काढून शिंदे गटाचा नामफलक जबरदस्तीने लावून वाचनालयाची जागा बळकवण्याचा प्रयत्न केला. तेथेही आम्ही संयम सोडला नाही. तसेच ५ ऑक्टोंबर शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यास पक्षाचा जय जयकार करत घोषणा देत शिस्तीने ठाणे रेल्वे स्थानकात जात असताना ७७ वर्षाचे निवृत्त शासकीय अधिकारी शंकर गणपत शिंदे यांच्यासह १३ ते १४ जणांवर गुन्हा दाखल करून दबाव तंत्राचा वापर केला जात आहे. ज्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यांनाच १३ ऑक्टोबर रोजी भल्या सकाळी चाप्टर केस भरल्याच्या नोटीसा देण्यात आल्या, असे आयुक्तांना दिलेल्या निवदेनात म्हटले आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : ‘आदिपुरुष’वर खरंच बंदी घातली जाऊ शकते का? सेन्सॉर बोर्डचे नियम जाणून घ्या

चेंदणी कोळीवाडा या भागातील गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असणारी शिवसेनेची शाखा शिंदे गटाकडून दुरुस्तीच्या नावाखाली बळकविण्याचा प्रयत्न करीत असताना सुद्धा अत्यंत संयमाने ही परिस्थिती हाताळून घेतली. ९ ऑक्टोंबर रोजी शिवसेना पक्षाच्या वतीने महाप्रबोधन यात्रेची सुरुवात ठाण्यापासून करण्यात आली. त्यावेळी गडकरी रंगायतन येथे आयोजित केलेल्या मेळाव्याला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे शिवसेने नेते भास्कर जाधव साहेब, खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे, अनिताताई बिर्जे, शिवसेना ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, धर्मराज पक्षाचे व कामगार नेते राजन राजे, सूत्रसंचालक सचिन चव्हाण या ७ जणांवर प्रक्षोभक भाषण दिल्याचा ठपका देऊन नौपाडा पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले. लोकशाहीने भाषण करण्याचा अधिकार दिला असतानाही गुन्हे दाखल होतात. परंतु १३ ऑक्टोबर २०२२ रोजी किसन नगर शाखेच्या बाहेर निशाणीच्या नावावर ढालीतून नंग्या तलवारी फिरवल्या हे कोणत्या कायद्यात बसत ? आणि त्यांच्यावर गुन्हे का दाखल होत नाहीत ? हा पक्षपात आम्ही सहन करणार नाही. न्याय मागण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

हेही वाचा >>> चीनला ‘जशास तसे’ उत्तर का नाही ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिवाळीला सगळीकडे आनंदमय वातावरण असताना दिवाळीमध्ये देखील खोडा घालण्याचा प्रयत्न शिंदे गट करीत आहेत. मासुंदा येथील राजवंत ज्वेलर्स समोर आनंद चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे गेल्या १० वर्षापासून दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही महापालिकेने व अग्निशामक दलाने या कार्यक्रमास परवानगी दिली आहे. हे माहीत असून देखील शिंदे गटाकडून आम्ही दिलेल्या अर्जाच्या तारखेच्या मागील तारीख टाकून सत्तेचा दुरुपयोग करून परवानगी घेण्याचे कारस्थान ही मंडळी करीत आहेत. दिवाळी पहाट हा कार्यक्रम आमची परंपरा लक्षात घेता व या ठिकाणावर आमचा हक्क लक्षात घेता हा न्याय आम्हाला मिळावा, अशी मागणी जिल्हा पदाधिकाऱ्यांच्यावतीने पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांच्याकडे करण्यात आली आहे.