पुरंदर पदभ्रमण
सहय़ाद्री ट्रेकिंग ग्रुपतर्फे २३ जून रोजी पुरंदर किल्ल्यावर एकदिवसीय भटकंतीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी स्वप्नील बाळेकर (८१४९३६७२१८) यांच्याशी संपर्क साधावा.

कात्रज ते सिंहगड
‘पगमार्क्स’तर्फे येत्या २२ जून रोजी रात्रीचा कात्रज-सिंहगड ट्रेकचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ०२०- ६६४९९९९९ या क्रमांकावर संपर्क साधावा.
कात्रज ते सिंहगड याच दिवसभराच्या ट्रेकचे नॅशनल एज्युकेशन फाऊंडेशन (एनईएफ) तर्फेही २२ जून रोजी आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी अक्षय (९५४५९१००२८) यांच्याशी संपर्क साधावा.

कातळधार धबधबा
‘एक्सप्लोर्स’तर्फे २३ जून रोजी कातळधार धबधबा पदभ्रमणाचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी आनंद केंजळे (९८५०५०२७२३) यांच्याशी संपर्क साधावा.

कळसूबाई मोहीम
ट्रेक किंगतर्फे २९-३० जून रोजी महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई शिखराच्या मोहिमेचे आयोजन केले आहे. वनसंपदेने समृद्ध असलेल्या या शिखरावर कळसूबाईचे छोटेसे मंदिर आहे. या शिखरावरून नगरच्या भंडारदरा आणि नाशिकच्या इगतपुरीकडील मोठा प्रदेश न्याहाळता येतो. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी सुषमा (९८२०८६३४०७) यांच्याशी संपर्क साधावा.

व्हॅली ऑफ फ्लॉवर्स
‘अ‍ॅडव्हेंचर हॉलीडेज’तर्फे २८ जुलै ते ४ ऑगस्ट आणि १८ ते २५ ऑगस्ट दरम्यान हिमालयातील ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ येथे पदभ्रमणाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९८६७३१८४४८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

‘गिरिप्रेमी’चे गिर्यारोहक ‘हनुमान तिब्बा’ मोहिमेवर
नुकतेच एव्हरेस्ट आणि ल्होत्से शिखराचे यश संपादन केलेल्या ‘गिरिप्रेमी’ संस्थेतील सात नवोदित गिर्यारोहक १६ जून रोजी ‘हनुमान तिब्बा’ मोहिमेवर रवाना झाले आहेत. हिमाचल प्रदेशमधील मनालीजवळ पिरपांजाल पर्वतरांगेमध्ये असलेल्या हनुमान तिब्बा या शिखराची उंची १९७५३ फूट आहे. प्रसिद्ध बियास नदीचे उगमस्थान असलेल्या बियास कुंड येथून या मोहिमेची सुरुवात होणार आहे. या चढाईत अनेक ठिकाणी असलेल्या आव्हानांवर तांत्रिक कौशल्याच्या आधारे मात करावी लागते. विशाल कडूसकर यांच्या नेतृत्वाखालील या संघात डॉ. सुमीत मांदळे, भूषण शेठ, किरण साळस्तेकर, अक्षय पत्के, मयूर मानकामे आणि डॉ. राहुल वारंगे हे गिर्यारोहक या मोहिमेत सहभागी होणार आहेत. उष:प्रभा पागे बेस कॅम्प सांभाळणार आहेत. नुकत्याच एका छोटेखानी कार्यक्रमात मोहिमेतील सदस्यांना तिरंगा आणि ‘गिरिप्रेमी’चा ध्वज प्रदान करण्यात आला.