News Flash

किरण बेदींचे ट्विट पाहून नेटकऱ्यांनी दिला Whatsapp Uninstall करण्याचा सल्ला

कारण वाचून तुम्हीही म्हणाल, 'अरे देवा...'

सध्या करोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउनची घोषणा केली आहे. त्यामुळे बहुतांश लोक हे सोशल मीडियावर आपला बराचसा वेळ घालवत आहेत. व्हॉट्सअप आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक आपले मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत आहेत. यात काही वेळा काही अफवा किंवा चुकीचा मजकूरदेखील शहानिशा न करता पाठवला जातो आणि तो अनेकदा फॉरवर्डही केला जातो. तशीच एक घटना पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांच्याबाबतीत घडल्याचे दिसून आले.

‘ढिंच्यॅक पूजाला तुझी जोडीदार बनव…’; युझवेंद्र चहलला चाहत्याची कोपरखळी

किरण बेदी यांनी एक व्हिडीओ शेअर केला. त्या व्हिडीओमध्ये खूप सारी कोंबडीची पिल्ले रस्त्यावर भटकाताना दिसत आहेत. या व्हिडीओबाबत तपशीलवार माहिती देताना किरण बेदी यांनी दावा केला की करोनामुळे काही अंडी लोकांनी खाण्याऐवजी रस्त्यावर टाकून दिली. त्या अंड्यांतून आता कोंबडीची पिल्लं बाहेर आली आहेत. त्याचसोबत त्यांनी ही निसर्गाची किमया आहे असेदेखील नमूद केले आणि व्हिडीओ फॉरवर्ड असल्याचेही लिहिले.

Video : चार दिवस उपाशी असलेल्या वाटसरूला पोलिसांनी दिला स्वतःचा डब्बा

किरण बेदी यांनी हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर लगेचच अनेकांनी त्यांना चुकीचा फॉरवर्डेड व्हिडीओ पोस्ट केल्याबद्दल ट्रोल केलं. अशा प्रकारचे फॉरवर्डेड मेसेज गांभिर्याने घेऊ नका असा काहींनी त्यांना सल्ला दिला, तर अनेकांनी त्यांना थेट आपलं व्हॉट्सअप डिलीट करून टाका असं सांगितलं.

ज्यावेळी किरण बेदी यांनी ट्विट केली, तेव्हा ते ट्विट सुमारे ५ लाखांहून अधिक लोकांनी पाहिले. या आधीही सूर्यदेवता ओम असा जयघोष करत असल्याचा एक चुकीचा व्हिडीओ पोस्ट केल्याने त्यांना ट्रोल करण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2020 11:03 am

Web Title: kiran bedi posts fake forward on egg and chicken gets troll netizens advice to uninstall whatsapp vjb 91
टॅग : Coronavirus,Kiran Bedi
Next Stories
1 चार कॅमेऱ्यांचा शानदार स्मार्टफोन झाला स्वस्त, ‘ही’ आहे नवी किंमत
2 लॉकडाउन : सिगारेटसाठी फ्रान्सहून थेट स्पेनला पायी निघाला पठ्ठ्या, हेलिकॉप्टरद्वारे करावं लागलं एअरलिफ्ट
3 ‘करोना’ला मारण्यासाठी बँकेच्या कॅशिअरचा ‘जुगाड’, व्हिडिओ झाला व्हायरल
Just Now!
X