News Flash

सुपर मॉम : मॅचच्या ‘ब्रेक’दरम्यान तिने केलं स्तनपान, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

आपल्या सात महिन्याच्या बाळाला स्तनपान केले.

भर मैदानात रडणाऱ्या बाळाला स्तनपान करणाऱ्या एका व्हॉलिबॉलपटू महिला खेळाडूचा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोची नेटकऱ्यांनी प्रचंड स्तुती केली आहे.

‘कांदा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा’, अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल

दिलीप कुमार यांनी दोन वेळच्या जेवणासाठी केले होते हॉटेलमध्ये काम

मिझोराम येथील आयझॉल येथे सध्या ‘मिझोराम स्टेट गेम्स २०१९’ ही राज्यस्तरीय स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत महिलांचा व्हॉलिबॉलचा सामना सुरु होता. या सामन्याच्या मध्यंतरात एका महिला स्पर्धकाने आपल्या सात महिन्याच्या बाळाला स्तनपान केले. तो क्षण एका अज्ञात व्यक्तिने आपल्या कॅमेरात कैद केला व सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो पीटर मॅक्झिम्स टॅरंग या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला. “मिझोरम स्टेट गेम्स २०१९ स्पर्धेतील सर्वात सुंदर फोटो” अशा शब्दात नेटकऱ्यांनी या फोटोची स्तुती केली आहे.

बाळाला स्तनपान करणारी ती महिला कोण आहे? तिचे नाव काय? किंवा ही घटना कुठल्या सामन्यादरम्यान घडली याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 4:29 pm

Web Title: mizoram volleyball player breastfeeds baby during half time image goes viral online mppg 94
Next Stories
1 तिची टिकटॉकवरील कमाई पाहून थक्क व्हाल, लोकप्रियता वाढल्याने नेमावे लागले बॉडीगार्ड
2 Jio ने हटवला ₹49 चा प्लॅन, आता ₹75 पासून सुरूवात
3 ऐकावं ते नवलंच : या माणसाकडे आहे ‘किलर गॅस’; वास घेताच होतो डासांचा खात्मा
Just Now!
X