News Flash

VIDEO: कोमोडो ड्रॅगनने शिकार करताना कासवाच्या कवचामध्ये डोकं घातलं अन्…

कासवाचे कवच टणक असल्याने ते तुटणे कठीण असते

कोमोडो ड्रॅगन

सरडा प्रकरातील जगातील सर्वात मोठ्या आकाराचे प्राणी म्हणजे कोमोडो ड्रॅगन. तीन मीटर लांब आणि ७० किलोपर्यंत वजन असणाऱ्या कोमोडो ड्रॅगनला नुसते पाहिले तरी अनेकांना धडकी भरते. आपल्या अवढव्य आकारामुळे आणि ताकदीमुळे या ड्रॅगनसमोर कोणत्याही भक्षाचा निभाव लागत नाही. हे ड्रॅगन पक्षी, लहान प्राणी अगदी एका दमात फस्त करतात. या ड्रॅगनचा चावा विषारी असतो असं मानलं जातं. त्यांनी एकदा आपली शिकार तोंडात पकडली ती त्या प्राण्याचा मृत्यू निश्चित असतो असं मानलं जातं.

कोमोडो ड्रॅगनच्या शिकार करण्याच्या शैलीची झलक दाखवणारा असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये कोमोडो ड्रॅगनने एका कासवाला फस्त केल्याचे दिसत आहे. हा ड्रॅगन कासवाला खाऊन झाल्यानंतर त्या कासवाच्या कवचामध्ये डोकं घालून आतील मांस खाताना दिसत आहे. कासवाचे कवच टणक असल्याने ते तुटणे कठीण असते म्हणूनच या ड्रॅगनने आपले तोंड त्या कवचामध्ये घातले. कासवाचे मांस खाऊन झाल्यावर मानेने झटका देत ड्रॅगनने हे कवच उडवून लावल्याचे व्हिडिओत दिसत आहे. एका समुद्रकिनाऱ्यावर हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे.

कोमोडो ड्रॅगन हे प्रामुख्याने इंडिनेशियामधील कोमोडो, रिंका, फ्लोरिस आणि गिली मोटँग या बेटांवर अढळून येतात. सामान्यपणे जंगलांमध्ये हे ड्रॅगन हरणं, साप आणि डुक्कर खाऊन जगतात. जास्तीत जास्त २४ किमोमीटर प्रती तास वेगाने ड्रॅगन पळू शकतात. आपल्या वजनाच्या ८० टक्क्यांपर्यंत आकार असणाऱ्या प्राण्याची हे ड्रॅगन सहज शिकार करु शकतात. या ड्रॅगनची लाळ विषारी समजली जाते, ज्यामध्ये ५० हून अधिक प्रकारचे विषाणू असतात. तुम्हीच पाहा हा व्हायरल झालेला व्हिडिओ

सामान्यपणे कोमोडो ड्रॅगन माणसांवर हल्ला करत नाहीत. मात्र आतापर्यंत वेगवगेळ्या घटनांमध्ये चार जणांचा या ड्रॅगन्सच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची नोंद आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2019 2:08 pm

Web Title: video komodo dragon buries its head in a turtle shell and devours it scsg 91
Next Stories
1 मिया खलिफाला जॉनी सीन्सने सांगितलं पॉर्न इंडस्ट्रीमधील यशाचं गमक, म्हणाला…
2 #MaharashtraPolitics: जोफ्रा आर्चरची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली
3 Video: हृदयद्रावक! वणव्याच्या आगीतून कोआलाला वाचवले आणि…
Just Now!
X