Viral Video: भारतीय पाककृती नेहमीच लोकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरते यात काही शंका नाही. चहा, वडापावपासून ते अगदी पाणीपुरी, पुरणपोळीपर्यंत प्रत्येक जण हे पदार्थ आवडीने खातात. अनेकदा परदेशातील रहिवासीसुद्धा या पदार्थांचा आस्वाद घेतात. पण, ऑस्ट्रेलियातील एका भारतीय शेफसाठी हा प्रयत्न अगदीच आव्हानात्मक ठरला. ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील ६७ वर्षीय भारतीय वंशाचे शेफ पदम व्यास त्यांच्या स्टॉलवर भारतीय खाद्यपदार्थ विकताना दिसले. त्यांना ऑस्ट्रेलियातील रहिवाशांनी वा ग्राहकांनी प्रतिसाद दिला की नाही ते या लेखातून जाणून घेऊ.

व्हायरल व्हिडीओ ऑस्ट्रेलियातील आहे. एका स्टॉलवर भारतीय शेफ बसलेले दिसत आहेत. त्यांनी स्टॉलवर पॅम्प्लेट ठेवले आहेत. तसेच बाउलमध्ये समोसे, चिकन टिक्का मसाला, बटर चिकन, कबाब आदी भारतीय पदार्थ ठेवलेले दिसत आहेत. व्हिडीओच्या सुरुवातीलाच शेफ पदम व्यास त्यांच्या स्टॉलवर, चेहऱ्यावर स्माईल ठेवून ग्राहकांचे स्वागत करण्यासाठी सज्ज झालेले दिसत आहेत. भारतीय पदार्थांचा स्वाद घेण्यासाठी शेफच्या स्टॉलवर ऑस्ट्रेलियाचे रहिवासी वा ग्राहक येतात की नाही, हे या व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…VIDEO: अति घाई संकटात नेई! दुचाकीस्वार ओव्हर टेक करायला गेला अन्… पुढे जे घडलं ते पाहून बसेल धक्का

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, ग्राहकांची वाट पाहणाऱ्या भारतीय शेफच्या स्टॉलवर बराच वेळ कोणी येत नाही, तेव्हा ते निराश झालेले दिसत होते. तसेच व्हिडीओच्या शेवटी पाऊस सुरू होताच ते स्टॉलवरील सामान घेऊन आश्रयासाठी धावताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ @himalayansaltsydney या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘आमच्या लाडक्या हेड शेफने ऑस्ट्रेलियातील रहिवाशांसाठी जेवण बनवले, पण कोणीही आले नाही’; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून या वयातसुद्धा शेफच्या प्रयत्नाचा आदर, तर त्यांच्या मेहनतीचं अनेक जण कौतुक करताना दिसत आहेत.

मनाने पराभव मान्य केला तर तुम्ही पराभूत, पण मनाने विजय मान्य केला तर तुमचा विजय निश्चित आहे. जीवन आपल्याला शिकवते की यशाचा मार्ग अपयशातून जातो. नशिबाची साथ न मिळाल्याने किंवा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी शेफ कुठेतरी कमी पडले म्हणून बहुदा त्यांच्या स्टॉलवर पदार्थांचे सेवन करण्यासाठी कोणीही आलेलं नाही. पण, प्रत्येक दिवस हा आपलाच नसतो हे लक्षात ठेवून त्यांनी पराभव स्वीकारला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा जोमाने स्टॉल लावला