Baby Elephant Video : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ हे फार भयानक, तर काही फारच मजेशीर आणि हसवणारे असतात. सध्या एका हत्तीच्या पिल्लाचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यात हत्तीच्या एका पिल्लाची आणि छोट्या बेडकाची अनपेक्षित भेट पाहायला मिळतेय. या व्हिडीओत हत्तीच्या पिल्लानं इतके क्यूट हावभाव केलेत की, नेटकऱ्यांचीही मनं जिंकली आहेत.
व्हिडीओमध्ये एक हत्तीचं पिल्लू आरामात अंघोळ करीत होते. यावेळी अचानक त्याच्या पायाजवळ छोटासा बेडूक येतो, त्या बेडकाला पाहून बावरलेलं हत्तीचं पिल्लू पाय मागे-पुढे करू लागतं. त्याच्या त्या मजेशीर कृतीनं नेटकऱ्यांना हसण्यास भाग पाडलं आहे.
हत्ती तसा खूप शांतप्रिय प्राणी मानला जातो. पण, हत्तीची पिल्लं फार गोंडस, मस्तीखोर, खोडकर असतात. हा व्हिडीओ पाहिल्यानंतरही तुम्हाला हेच दिसेल.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक हत्तीचं पिल्लू मजा-मस्ती करीत अंघोळीचा आनंद घेत आहे. कधी सोंड उंचावून, तर कधी पाण्याचा शॉवर घेत त्याची धमाल सुरू आहे. याचदरम्यान एक बेडूक उड्या मारत त्याच्या अगदी पायाजवळ येतो. बेडकाला पाहताच बावरलेलं हत्तीचं पिल्लू तिथेच थांबतं आणि एक पाऊल मागे घेतं. आपला पाय त्याच्यावर पडू नये यासाठी ते पाय मागे-पुढे करीत जणू उड्याच मारतं. इतक्यात बेडूक उड्या मारत निघून जातो. पण, हत्तीच्या या कृतीतून त्याची इतर जीवांविषयी असलेली काळजी दिसून येते.
अनेकांनी हत्तीच्या त्या पिल्लाच्या निरागसतेचं कौतुक केलं आहे. त्याचा तो क्यूट व्हिडीओ @rajamannai_memories नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर युजर्सही भरभरून कमेंट्स करीत आहेत. एकानं कमेंट करीत लिहिलं की, ही फक्त भीती नाही, तर त्या छोट्या प्राण्याबद्दलची करुणा आणि आपुलकी होती. दुसऱ्या युजरनं लिहिलं की, ते घाबरलेलं नाही, त्याला काळजी होती की, बेडूक त्याच्या पायाखाली येऊ शकतो. तिसऱ्या एकानं म्हटलं की, आपण प्राण्यांकडून मानवता शिकू शकतो.