Couple viral video: आजकाल सोशल मीडियावर प्रेमाच्या नावाखाली अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. काही जोडपी प्रेमाच्या मर्यादा ओलांडून सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्ये करताना दिसतात. त्यांच्या या कृतीमुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो, पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते. ही जोडपी एकमेकांच्या प्रेमात इतकी बुडेलेली असतात की आपण कुठे आहोत, याचं भान देखील त्यांना उरत नाही. यापूर्वी स्टेशनवर रोमान्स करणाऱ्या अनेक कपलचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक कपल नर्मदा नदीच्या किनारी गुपचूप भेटायला गेलेलं एक प्रेमी युगुल अचानक आलेल्या पुराने अडकून पडलं आणि पुढे काय घडलं ते तुम्हीच पाहा.
प्रेम करताना वेळ, जागा कधीही पाहू नये असे म्हटले जाते. जसजसा काळ बदलला तसतशा प्रेमाच्या व्याख्याही बदलल्या. आजकाल तरुण तरुणी कोणत्याही गोष्टीचे भान न ठेवता सार्वजनिक ठिकाणी नको ते चाळे करू पाहतात. सर्वांसमोर आपल्या प्रेमाचे प्रदर्शन करू लागतात. असे करताना आजूबाजूच्या परिसराचा ते विचार करत नाहीत. प्रेम व्यक्त करताना आजूबाजूच्या परिस्थितीचे भान ठेवणेही तितकेच गरजेचे असते. आपल्यामुळे इतरांना त्रास तर होत नाही ना याची काळजी घेतली पाहिजे. सोशल मीडियावर नेहमीच प्रियकर प्रेयसीचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. यात बऱ्याचदा ते नको ते चाळे करताना दिसून येतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ही घटना गुजरातमधील एका जिल्ह्यात. भर पावसात नदीला पूर आलेला असतानाही हे कपल नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर एकांतात भेटण्यासाठी गेले. सुरुवातीला सगळं सुरळीत चाललं होतं. दोघं एकत्र वेळ घालवत होते. पण काही वेळातच पावसाचा जोर वाढला आणि नदीचा पाणीप्रवाह अचानकच वाढला. नदीने रौद्र रूप धारण केलं आणि प्रेमीयुगुल मागे फिरू शकत नाही, इतक्या पाण्यात अडकून पडले.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून अनेक युजर्सनी यावर संताप व्यक्त केला आहे. काहींनी या जोडप्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे तर काहींनी त्यांना वाचवणाऱ्यांचं कौतुक केलं आहे.