Viral video: लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात.सोशल मीडियावर नवरा नवरीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच आता आणखी एका नवरा नवरीचा व्हिडीओ व्हायरल होतोय. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी जे खेळ खेळले जातात या दरम्यानचा हा व्हिडीओ असून तो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. कारण हा खेळ खेळताना नवरा नवरीमध्ये तुफान हाणामारी झालीय.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवरा-नवरी अंगठी शोधण्याच्या खेळात अक्षरश: हाणामारी करू लागले. नवरा-नवहळदीच्या पिवळ्या पाण्यामध्ये अंगठी लपवण्यात येते आणि ती नवरा-बायकोला शोधायला सांगितली जाते. जो अंगठी आधी शोधेल, तो विजेता ठरतो. पण या साध्या खेळाचं रूपांतर पाहता पाहता कुस्तीच्या आखाड्यात झालं. अंगठीसाठी दोघंही अक्षरशः WWE फायटर्ससारखे लढू लागले. एकमेकांना जमिनीवर लोळवू लागले. री अंगठी शोधण्याच्या खेळात अक्षरश: हाणामारी करू लागले.
लग्नानंतरचे खेळ म्हणजे लग्नाच्या वेळी खेळले जाणारे खेळ, विशेषतः नववधू आणि नवऱ्यासाठी. या खेळांचा मुख्य उद्देश नवदाम्पत्याला एकत्र मजा करायला आणि त्यांचे संबंध दृढ करायला मदत करणे आहे. या खेळांमध्ये काही पारंपरिक आणि काही आधुनिक खेळ समाविष्ट आहेत, जे विविध सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरांवर आधारित आहेत. यामध्ये नववधू आणि नवऱ्यासाठी हळद लावण्याचा आणि उतरवण्याचा कार्यक्रम. नववधू तिच्या नवऱ्याच्या घरी पोहोचल्यावर, तिच्यावर पाणी आणि दूध ओतणे. नववधूच्या माहेरच्या मंडळी तिला काही प्रश्न विचारतात, ज्यावर तिने उत्तरे द्यावी लागतात. यामध्ये नववधू आणि नवऱ्याने एकमेकांना प्रश्न विचारणे किंवा एकमेकांना काही कामे करणे. याचा समावेश असतो. यामध्ये नववधू आणि नवऱ्याने एकमेकांना हसवणे, किंवा त्यांना काही मजेदार कामे करणे. या खेळांचा मुख्य उद्देश नवदाम्पत्याला एकत्र वेळ घालवायला आणि त्यांचे संबंध दृढ करायला मदत करणे आहे. या खेळांमुळे नवदाम्पत्याला एकमेकांसोबत अधिक चांगला संबंध निर्माण करण्यास मदत होते. मात्र या व्हिडीओमध्ये उलट चित्र पाहायला मिळालं.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ khushiphotostudiobarjal नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.