Viral Video : असं म्हणतात की प्राण्यांवर प्रेम केलं तर ते तुमच्यावरही प्रेम करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गाय चक्क तरुणीच्या मांडीवर विसावा घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
भारतीय संस्कृतीत गायीला विशेष महत्त्व आहे. देवतांप्रमाणेच गायींची पूजा केली जाते. गायीला नैवद्य दाखवला जातो. नुकतीच वसुबारस साजरी करण्यात आली. या निमित्त्याने गायीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. असाच गायीबरोबरची तरुणीची खास मैत्री दाखवणारा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की गाय गोठ्यात बांधलेली आहे.गाय उभी असते पण तरुणी खाली बसलेली असते. तरुणीला खाली बसलेली पाहून गाय सुद्धा तिच्या शेजारी खाली बसते आणि डोके तरुणीच्या कुशीत ठेवते. तरुणीच्या कुशीत झोपलेल्या या गायीला पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. आजवर तुम्ही कुत्र्यांचे अनेक गोंडस व्हिडीओ पाहिले असतील पण हा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ पाहून तुम्हाला प्राणी किती प्रेमळ असतात, हे कळेल.
हेही वाचा : Personality Test : तुम्हाला कोणता चेहरा आनंदी दिसतो? उत्तरावरुन कळेल तुमचा स्वभाव अन् व्यक्तिमत्त्व
varsha_and_kbm_gaushala या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, ” त्यांच्यावर प्रेम करा ते तुमच्यावर प्रेम करतील.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सर्वात प्रामाणिक मित्र हे प्राणी असतात. तर एका युजरने लिहिलेय,”खरंय. जीव लावला की दुप्पट जीव लावतात.” आणखी एका युजरने लिहिलेय, “ह्रदयस्पर्शी व्हिडीओ”