Wildlife Viral Video Crocodile Vs Deer: जंगलात कुणीही कायमचं शिकारी नाही आणि कुणीही कायमचं शिकारही नाही. कधी एक जण शिकारी असतो, तर पुढच्याच क्षणी तोच शिकारही होऊ शकतो. प्राणिमात्रांचं हे भयावह आणि तितकंच थरारक जग सोशल मीडियावर दररोज समोर येतंय, जिथे प्रत्येक क्षण म्हणजे जीवन-मरणाचा खेळ असल्याचा प्रत्यय येत असतो. अचूकता साधता आली, तर जीव वाचतो; पण हलक्याशा चुकीनं मृत्यूचं दार उघडतं. जंगलात जिवंत राहायचं असेल, तर तुम्हाला चलाखी अन् हुशारीनं वावरायला शिकायलाच हवं; अन्यथा तुमचं काही खरं नाही. जंगलातला एकच नियम इथे फक्त तोच जगतो, जो सतत जागा आणि सावध असतो. कारण- येथे एका क्षणाचं दुर्लक्षही थेट मृत्यूला आमंत्रण देऊ शकतं आणि हीच गोष्ट समोर आलेल्या एका थरारक व्हिडीओमध्ये पुन्हा सिद्ध झाली आहे.

मगर किती खतरनाक शिकारी आहे हे काही वेगळं सांगायला नको. एका फटक्यात समोरच्या प्राण्याचे दोन तुकडे करण्याची क्षमता मगरीमध्ये असते. कोणताही जीव मगरीसमोर आला, तर तो त्याला सोडत नाही. अगदी शिकारीला काही कळण्याच्या आतच मगर त्याची शिकार करते. मगरीसमोर जंगलाचा राजा सिंह, वाघ, बिबट्या अशा खतरनाक प्राण्यांचंही काही चालत नाही. मगर शिकार करतानाचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील, जे अनेकदा व्हायरल होतात. सध्या व्हायरल होणारा असाच आणखी एक व्हिडीओ हैराण करून सोडणारा आहे. मगरीच्या शिकारीचा हा व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

व्हिडीओमध्ये दिसतं की एक हरीण नदीकाठी पाणी पिण्यासाठी येतं. ते पूर्णतः सावध असून, त्याचे डोळे सतत इकडे-तिकडे फिरत आहेत. पण, बिचाऱ्याची जराशी नजर चुकली आणि ‘दर्याचा राजा’प्रमाणे वावरणारी मगर अचानक वर येऊन, त्या हरणावर हल्ला करते. पण, हरीणदेखील मागे हटणारं नसतं, ते जीव वाचण्यासाठी अंगातली संपूर्ण शक्ती एकवटून, विजेसारखी हवेत उडी घेतं. त्या क्षणी वाटतं की, ते वाचेल… पण शिकारी मगरीची पकड इतकी जबरदस्त असते की, हरीण त्याच्या जबड्यातून सुटू शकत नाही. एक क्षण नजर चुकल्यानं ते हरीण प्राण गमावून बसतं.

हा धक्कादायक व्हिडीओ सध्या @naturehuntdiaries या Instagram हँडलवर पोस्ट करण्यात आला आहे आणि लाखो लोकांनी तो पाहिला आहे. हजारो युजर्सनी त्यावर कमेंट्स करीत हरणाच्या धाडसाचं कौतुक केलं; तर काहींनी मगरीच्या शिकारी क्षमतेला सलाम ठोकला.

येथे पाहा व्हिडीओ

एका युजरनं लिहिलं, “मगरीपासून वाचणं प्रत्येकाच्या नशिबात नसतं”. दुसऱ्यानं म्हटलं, “जंगलाची दुनिया म्हणजे फक्त संघर्ष आणि अस्तित्वासाठीची झुंज”, आणखी एकानं लिहिलं, “हरणानं शेवटच्या क्षणापर्यंत झगडून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण नशीबानं साथ दिली नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ फक्त एक शिकार नाही, तर निसर्गातला रोजचा जीवघेणा संघर्ष दर्शवतो. जिथे कोणतीही चूक थेट मृत्यूला समोर घेऊन येते.