Women Singing Justin Beiber Baby Song : आजकाल सोशल मीडियावर आपल्याला गाण्यांची कव्हर गाणी ऐकायला मिळतात. कव्हर साँग्स म्हणजे मूळ गाणं लोक त्यांच्या शैलीत गायले जाते. भारतात तर अनेक अवलिया आहेत जे कोणत्याही गाण्याला आपली वेगळी चाल देऊन गातात. अशी अनेक गाणी यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाली. आता अशाचप्रकारचं एक गाण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात काही महिला मिळून एक सुप्रसिद्ध इंग्रजी गाण्याचं कव्हर साँग गात आहेत. हा व्हिडीओ व्हायरल होण्यामागचे कारण म्हणजे यात दिसणाऱ्या महिला पूर्णपणे देसी आहेत. म्हणजे त्यांना पाहून तुम्हाला वाटणार नाही की, त्यांचा इंग्रजी गाण्यांशी दूरदूरपर्यंत संबंध असेल. तरीही त्या अप्रतिमरित्या एक इंग्रजी गाणे गातायत. विशेष म्हणजे त्यांनी इंग्रजी गाण्याला चक्क कव्वालीची चाल दिली आहे, त्यामुळे तुम्ही त्यांचे गाणे एकदा ऐकले तर तुम्हाला ते पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटेल.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हा पाहू शकता की, काही महिला एका तुटलेल्या मोकळ्या घरात बसून गाणे गात आहेत. तुम्ही जस्टिन बीबरचे नाव ऐकले असेल. जो लहान वयातच जगातील प्रसिद्ध पॉप सिंगर बनला, ज्याचे ‘बेबी’ गाणं या महिला गात आहेत. विशेष म्हणजे या महिलांनी आपल्या खास स्टाइलमध्ये ते गाणे सादर केले आहेत. जे ऐकून युजर्स या सिंगर महिलांना मस्करीत ‘जस्टिन बीबर’ ऐवजी ‘जस्टिन भाभियां’ म्हणत आहेत.
देसी महिलांनी इंग्रजी गाण्याला दिली कव्वालीची चाल
देसी महिलांचा हा इंग्रजी गाणं गातानाचा व्हायरल झालेला व्हिडिओ एका बांधकामाधीन इमारतीतील दिसत आहे. जिथे सर्वत्र काँक्रिट पडलेले आहे. याठिकाणी काही महिला कॉट आणि खुर्च्यांवर बसून जस्टिन बीबरचे बेबी गाणे गात आहेत. हे गाणं त्यांनी अशाप्रकारे जे एकूण तुम्ही त्याची इंग्रजी चाल विसरून जाल, या गाण्याला त्यांनी खास कव्वालीची चाल दिली आहे. यावेळी तिथे काही पुरुषही बसून गाण्याचा आनंद घेत आहेत. यात एक महिला तांब्या वाजवत गाण्याला साथ दिली आहे. या व्हिडीओतील महिला अफगाणिस्तानमधील असल्याचा दावा काहीजण करत आहेत. मात्र ठिकाणाबाबत ठोस माहिती मिळालेली नाही.
हा व्हिडिओ @imjustbesti या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे, ज्याला ७० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकाने कमेंट करत म्हटेल की, जस्टिन बायका. तर एकाने म्हटले की, त्या एक खड्डा खणत आहे जेणेकरून त्या त्यांचे टॅलेंट त्यात गाडू शकतील. यावर तिसऱ्या एका युजरने म्हटले की, परीक्षेच्या काळात अशी गाणी मनात वाजत राहतात. याशिवाय चौथ्या एका युजरने मजेशीर कमेंट करत म्हटले की, कदाचित या महिला कॅनडाला जाण्याच्या तयारीत आहेत. बेबी’ गाण्याचे ‘कीर्तन वर्जन’ आहे, अशी भन्नाट कमेंटही एकाने केली आहे.