Viral Video : अनेक जण शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी गाव सोडून शहराकडे धाव घेताना दिसत आहे. गावाऐवजी शहरात घर बांधून तिथेच स्थायिक होत आहे. स्वप्नांच्या मागे धावताना आपण गावाकडे पाठ दाखवत आहोत पण शहरात वावरत असताना अनेकदा गावाकडची आठवण येते. गावाकडच्या गोष्टी आठवतात. तुम्हाला सुद्धा शहरापेक्षा गाव आवडते का? सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गावाकडचे राहणीमान दाखवले आहे. व्हिडीओ पाहून अनेकांना गावाकडची आठवण येईल किंवा त्यांचे गाव आठवेल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये गावाकडचे वातावरण, गोष्टी आणि राहणीमान दाखवले आहेत. सुरुवातीला नदीच्या किनारी वसलेलं सुंदर मंदिर दाखवले आहे. त्यानंतर एक आजीबाई बैलगाडीवर चालवताना दिसत आहे. त्यानंतर एक व्यक्ती धान्य काढताना दिसत आहे. पुढे व्हिडीओत काही नावाडी नौका चालवताना दिसत आहे. पुढे एक हिरवीगार सुंदर बाग दिसत आहे. या बागेतील झाडांवरील फुले आणि पानांवर फुलपाखरू उडताना दिसत आहे. एका झाडाखाली वयोवृद्ध लोकांचा कट्टा रंगलेला दिसत आहे. व्हिडीओत पुढे नदीकाठी तरुण मंडळी बसलेली दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक जणांना त्यांच्या गावाची आठवण येऊ शकते. या व्हिडीओवर कॅप्शन लिहिलेय, “धावत्या शहरापेक्षा शांत गाव भारी”

हेही वाचा : हीच खरी माणुसकी! चिमुकल्या मुलांनी वाचवला कुत्र्याचा जीव, व्हिडीओ होतोय व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

maharashtra_trending_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “
कोणा कोणाला शहरापेक्षा गाव आवडते ?”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “गावच्या सारखी मजा कुठेच येत नाही” तर एका युजरने लिहिलेय, “गावची मजाच खूप वेगळी असते. गावात राहाल तर टेन्शन फ्री राहतो. छान हवा, पौष्टिक जेवण मिळते.शहरामध्ये सांगता येत नाही की कोणता दिवस हा शेवटचा आहे. गाव म्हणजे आनंद” आणखी एका युजरने लिहिलेय, “दादा किती काही झाले तरी गावाचे सौंदर्य शहराला काय..”