सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये प्राण्यांचेही कित्येक व्हिडिओ असतात. अनेकदा जंगली प्राणी मानवी वस्तीमध्ये शिरतात तर कधी जंगल सफारी दरम्यान प्राण्यांचे व्हिडिओ समोर येतात. कधी हिंस्र प्राणी प्राण्यांची शिकार करताना दिसतात तर कधी प्राण्यांचा मजेशीर व्हिडिओ चर्चेत येतो. कधी बिबट्या, वाघ, सिंह, मगर, साप या प्राण्यांचे शिकारची व्हिडिओ चर्चेत येतात तर कधी माकड, हत्ती, कुत्रा या प्राण्यांचे मजेशीर व्हिडिओ समोर येतात. आपल्यापैकी अनेकांनी साप आणि मुंगूस यांच्यातील लढत पाहिली असेल पण तुम्ही कधी एखाद्या घोडा आणि हत्तीची लढत पाहिली आहे का? होय तुम्ही योग्य तेच ऐकत आहात. हा व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये, भररस्त्यात एक पांढरा घोडा आक्रमकतेने एका भल्या मोठ्या हत्तीवर हल्ला करताना दिसत आहे. हा व्हिडिओ मध्य प्रदेशमधील रतलाम शहरातील आहे. अचानक सुरू झालेली ह लढत पाहून तेथे उपस्थित लोक जीव वाचण्यासाठी सैरावैरा धावताना दिसत आहे.

ही घटना पलसोडा फाट्याजवळ घडली. व्हिडीओमध्ये दिसते की, घोडा हत्तीच्या मागे मागे धावत आहे. त्याला चावण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच उडी मारून हत्तीच्या अंगावर झेप घेत आहे. दरम्यान हत्तीच्या पाठीवर बसलेला माहूत घोड्याला काठीने हुसाकवून लावण्याचा आणि परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत आहे

पाहा Viral Video

घोड्यापेक्षा हत्ती आकाराने आणि ताकदीने मोठा असूनही हल्ला करण्याऐवजी स्वत:ची सुरक्षा करण्याचा प्रयत्न करत आहे. हत्ती घोड्याबरोबरची लढत टाळण्याचा प्रयत्न करत आहे पण घोडा काही मागे हटण्यास तयार नाही. हत्ती तेथून जाण्याचा प्रयत्न करतो पण घोडा त्याच्या पाठीमागे धावताना दिसत आहे ज्यामुळे दोघांमधील वाद आणखी वाढल्याचे दिसत आहे. उसळी मारणारा घोडा पाहून रस्त्यावरून जाणारे लोक घाबरलेले दिसत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, घोड्याला जवळच बांधण्यात आले होते आणि हल्ला करण्यापूर्वी तो सुटला होता. प्राण्याच्या आक्रमकतेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही

जरी लोकांना कोणतीही दुखापत झाली नसली तरी, रस्त्याच्या मध्यभागी दोन मोठ्या प्राण्यांची लढत सुरु झाल्याचे दृश्य पाहून सर्वत्र घबराट पसरली. पण, लढतीदरम्यान एक दुचाकी खाली पडताना दिसत होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडिया वापरकर्ते हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. इंटरनेटवर या लढत पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.