सोशल मीडियावर दररोज काही विचित्र व्हिडीओ पाहायला मिळतात. एक प्रकारे, इंटरनेट हे आश्चर्यकारक आणि विचित्र व्हिडीओंचा खजिना आहे. असाच एक विचित्र व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक गोंडस कुत्रा बाईकची सवारी करताना दिसत आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा कुत्रा हेल्मेट घालून बाईकवर बसलेला दिसत आहे.

व्हिडीओमध्ये एक दुचाकी रस्त्यावरून जात असल्याचे दिसत आहे. ही बाईक एक माणूस चालवत आहे. त्या व्यक्तीच्या मागे एक कुत्रा बसलेला आहे. ही व्यक्ती हेल्मेट घालून बाईक चालवत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हेल्मेट घातलेल्या व्यक्तीसोबत कुत्राही बाईकवर हेल्मेट घालून बसला आहे. आपल्या सुरक्षेसाठी या कुत्र्याने हे हेल्मेट घातले आहे. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया यूजर्स खुश झाले.

व्हिडीओमध्ये दिसणारा हा कुत्रा एक प्रकारे समाजाला संदेशही देत ​​आहे. या काळ्या रंगाच्या कुत्र्याला नेटकऱ्यांची पसंती मिळाली असून त्याचा शोधही घेतला जात आहे. व्हिडीओनुसार, बाइक चालवणाऱ्या व्यक्तीच्या मागे बसलेला कुत्रा हा त्याने पाळलेला आहे. तो अतिशय शांतपणे त्या व्यक्तीच्या खांद्यावर हात ठेवून बसला आहे. प्रथमदर्शनी पाहिल्यास पुरुषाच्या मागे एक महिला हेल्मेट घालून दुचाकीवर बसलेली असल्याचे वाटते. मात्र, कॅमेरा जवळ गेल्यावर तो कुत्रा असल्याचे कळते.

Viral Video : रस्त्यावर सायकल चालवणाऱ्या वृद्धाला बैलने शिंगांवर उचलले आणि…; पाहा काळजात धस्स करणारा व्हिडीओ

विमानातही असतात हॉर्न्स; जाणून घ्या हे हॉर्न्स नेमके कधी आणि कशासाठी वापरतात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा जबरदस्त व्हिडीओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये ‘क्यूट’ असे लिहिले आहे. व्हिडीओ पाहून सोशल मीडिया यूजर्स वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत. काही लोक माणसांना या कुत्र्याकडून शिकण्याचा सल्लाही देत ​​आहेत.