Friends Group Funny Video Viral : आयुष्यात मैत्री फार महत्त्वाची असते. कारण- हेच मित्र-मैत्रिणी अनेकदा सुख-दु:खांत साथ देतात. वेळ पडली, तर जीवाला जीव देण्यासाठीही मागे-पुढे पाहत नाहीत. तर, दुसरीकडे जिथे मज्जा-मस्ती करण्याची वेळ येते तेव्हाही ते पुढे असतात. अनेकदा मित्रांचे ग्रुप ट्रिपला जातात, त्यावेळी ते एकमेकांसह अगदी विचित्र मस्करी करताना दिसतात. अनेकदा मित्रांच्या कारनाम्याचे व्हिडीओ सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होतात. मित्रांच्या एका ग्रुपमधील अशाच कारनाम्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हाला हसू आवरणं अवघड होईल.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मित्रांचा एक ग्रुप मजा-मस्ती करण्यासाठी नदीवर गेलेत. यावेळी खेळण्यासाठी म्हणून त्यांनी काठावरील एका झाडाला एक मजबूत दोरी बांधलीय. या दोरीच्या टोकाशी एक काठी जोडलीय, त्या काठीला धरून मित्र वाहत्या नदीवर झुला झुलताना दिसतायत. काठी पकडून झुलत ते नदीवरून पुढे जातात आणि पुन्हा काठावर येतात. अशा प्रकारे एक मित्र आधी जातो, जो व्यवस्थित झुलून परत काठावर येतो. त्यानंतर दुसरा मित्रही तसेच करायला जातो; पण इतर मित्र त्याची चांगलीच फजिती करतात. त्याच्या हातात दोरीला न बांधलेली दुसरीच काठी देतात, जिला पकडून तो झुलण्यासाठी जातो आणि थेट नदीत पडतो. मित्र त्याची अशी काय फजिती करून हसतात की ते पाहून तुम्हालाही हसू येईल.

हा व्हिडीओ थांबतो तेव्हा स्क्रीनवर दोन नियम लिहिलेले दिसतात. पहिला नियम म्हणजे मित्रांवर कधीही विश्वास ठेवू नका आणि दुसरा नियम म्हणजे नेहमी पहिला नियम पाळा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मैत्रीचा हा अनोखा व्हिडीओ इस्टाग्रामवर theindiancasm नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘चल भावा, आता पुढे कोण येत आहे.’ दरम्यान, सोशल मीडियावक अनेकांनी या व्हिडीओला लाइक केले आहे, तर अनेक युजर्स कमेंटमध्ये हसण्याच्या इमोजी शेअर करीत आहेत.