दारूच्या व्यसनामुळे अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचं आपण पाहिलं आहे. दारुच्या नशेत अनेक लोक भयंकर आणि जीवघेणी कृत्य करत असतात. सध्या आंध्र प्रदेशातील अशीच एक घटना उघडकीस आली आहे. ज्यामध्ये दारू पिऊन घरी आलेल्या व्यक्तीने आपलं आयुष्य गळफास लावून संपवंल आहे. पण यावेळी त्याने आपल्या चार वर्षाच्या मुलाला फाशी घेतानाची दृश्य शूट करायला लावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दारु पिलेली व्यक्तीचे नाव शेख जमाल बाली (३६) असे आहे. दारु पिऊन आलेला जमाल आपल्या खोलीत गेला आणि आपल्या ४ वर्षाच्या मुलाला बोलावून त्याच्या हातात मोबाईल दिला आणि व्हिडिओ शूट करायला सांगितले. यानंतर त्यांने मुलासमोरच गळफास घेत आत्महत्या केली. लहान मुलाने वडिलांचे विचित्र कृत्य पाहून आरडाओरडा सुरु केला. मुलाचा आवाज ऐकून त्याचे नातेवाईक घटनास्थळी धावत आले, त्यावेळी त्यांना जमाल लटकलेल्या अवस्थेत दिसला. त्यानंतर त्या जमालला रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.




पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख जमाल बाली (३६) हा त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर मानसिक नैराश्यात गेला होता. त्यामुळे तो अनेकदा दारू पिऊन घरी यायचा. त्यांची पत्नी व्यवसायानिमित्त कुवेतमध्ये राहते. जमाल हा ट्रक चालक असून तो त्याची आई, बहीण आणि तीन मुली आणि ४ वर्षाच्या मुलासोबत राहत होता. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, जमालने वडिलांच्या मृत्यूनंतर ड्रग्स घेण्यास सुरुवात केली होती. बुधवारी रात्री ९.३० च्या सुमारास तो दारूच्या नशेत होता यावेळी तो थेट तिसऱ्या मजल्यावरील अपार्टमेंटमध्ये गेला. त्यावेळी त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य देखील त्याच मजल्यावर होते.
हेही पाहा- शाळेतील वाद पोहोचला शेतापर्यंत; दोन शिक्षिकांनी केली एकमेकांनी मारहाण; Video पाहून डोकंच धराल
वृत्तानुसार, जमालने आपल्या मुलाला त्याच्या खोलीत बोलावले आणि त्याच्या मोबाइल व्हिडिओ शूट करण्यास सांगितले. यानंतर त्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. वडिलांना अशा अवस्थेत पाहून मुलाने आरडाओरडा केला. त्याचा आरडाओरडा ऐकून आई व बहिणी खोलीत गेल्या असता जमाल लटकलेल्या अवस्थेत दिसला. घरच्यानी तत्काळ जमालला राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, कडप्पा येथे नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर नातेवाईकांनी कडप्पा-२ टाऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
पोलील उपनिरीक्षक जया रामुलू यांनी मीडियाला सांगितले, “मृताचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. जमालच्या आत्महत्येचा व्हिडिओ त्याच्या मोबाईलवरून एका नातेवाईकाला पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. तेव्हापासून फोन ‘लॉक’ आहे. तपास अधिकारी तो मोबाईल जप्त करून ‘अनलॉक’ करण्याचा प्रयत्न करत आहेत.”