Viral Video : आपल्या मानवी आयुष्यात स्वच्छतेला खूप महत्त्व आहे. स्वच्छता ही निरोगी शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. लहानपणापासून आपण स्वच्छतेचे महत्त्व जाणून घेत आहोत. आपले घर, परिसर, गाव -शहर स्वच्छ ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान ही मोहीम मोठ्या उत्साहाने सुरू केली आहे. देश स्वच्छ रहावा, या हेतूने ही मोहीम राबवली जात आहे.

अनेक जण स्वच्छतेचे महत्त्व समजून त्यासाठी काम करताना दिसतात. आपले घर, परिसर, कामाचे ठिकाण किंवा सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता पाळतात पण काही लोक मात्र याकडे दुर्लक्ष करतात. अशा लोकांना कधी स्वच्छतेचे महत्त्व समजेल, असा प्रश्न पडतो. सोशल मीडियावर स्वच्छतेविषयी जनजागृती पसरवणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.

bmc launched cleanliness drive to clean Mumbai
महापालिकेने घेतला शहर स्वच्छतेचा वसा, दररोज स्वच्छता मोहीम राबविण्याचा महापालिकेचा निर्णय
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Car Cabin Bad Smell
तुमच्याही गाडीमध्येही सतत घाणेरडा दुर्गंध येतो? मग एका स्वस्तातल्या सोप्या उपायाने गाडी आतून होईल फ्रेश
Mom Dress up the dog with a hat and sweater
थंडीपासून संरक्षणासाठी जबरदस्त जुगाड! श्वानाला कानटोपी, स्वेटर घालून केले तयार; पाहा मजेशीर VIDEO
Vegetarian diet for dogs
आता तुमचे पाळीव प्राणीही घेऊ शकतात शाकाहारी आणि वीगन आहार? तज्ज्ञ काय सांगतात…
Viral Video Shows Pet Dog Wants To Ride
‘मम्मी प्लिज मला चढू दे…’ जत्रेत राईडमध्ये बसण्यासाठी श्वानाचा हट्ट, मालकिणीने केला ‘असा’ पूर्ण; पाहा Viral Video
Dogs Killed
Dogs Killed : अमानवी कृत्य… कुत्र्यांचे पाय आणि तोंड बांधून पुलावरून फेकून दिलं; २१ श्वानांचा मृत्यू, २१ गंभीर
Air Quality Byculla , Air Quality Borivali,
बोरिवली व भायखळ्यातील निर्बंध उठले, ‘हे’ भाग निरीक्षणाखाली, वायू प्रदूषणासंदर्भात पालिका आयुक्तांनी दिला इशारा

हेही वाचा : तू एवढा देखणा आहेस? ट्रकवर लिहलेली शायरी पाहून रस्त्यातच अडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा पोलिसांनी नेमकं काय केलं

सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये चक्क कुत्रा नदीतून कचरा बाहेर काढून कचरापेटीत टाकताना दिसत आहे. कुत्र्याची हा कृती पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक नदी दिसेल. या नदीच्या दिशेने एक कुत्रा धावत जात आहे पुढे हा कुत्रा असं काही करते की तुम्हीही अवाक् व्हाल. हा कुत्रा नदीतील कचरा उचलतो आणि कचरापेटी आणून टाकतो. त्याच्या या कृतीला पाहून आजुबाजूचे लोक थक्क होतात. काही लोक त्याचा व्हिडीओ शूट करतात. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल की या कुत्र्याला स्वच्छतेचे महत्त्व कळले पण आपल्याला कधी कळणार? या व्हिडीओवर लिहिलेय, “घाण करणाऱ्या माणसाला इतकं स्वच्छतेचे महत्त्व कळणार का?”

हेही वाचा : संस्काराशिवाय आयुष्य काहीच नाही! चिमुकलीने दाखवली माणुसकी, वृद्धी व्यक्तीला पाजले पाणी, पाहा VIDEO VIRAL

पाहा व्हायरल व्हिडीओ

lay_bhari_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “स्वच्छतेचे महत्व कधी कळणार ?”

हेही वाचा : तू एवढा देखणा आहेस? ट्रकवर लिहलेली शायरी पाहून रस्त्यातच अडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा पोलिसांनी नेमकं काय केलं

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कुत्रा समजायला लागला पण माणूस समजूनही जसे वागायचं तसाच वागतो….” तर एका युजरने लिहिलेय, “ह्या व्हिडिओ मधून खूप काही शिकायला मिळते पणं ह्या जगात शिकणारे नाही.” आणखी एका युजरने लिहिलेय, “माणसाला स्वत:ला लाजवणारा व्हिडीओ” एक युजर लिहितो, “प्राणी माणसाची जागा घेण्याचा प्रयत्न करत आहे एवढे सुद्धा माणसाला कळत नाही” तर एक युजर लिहितो, “म्हणून माणसापेक्षा प्राणी प्रामाणिक असतात कोणत्याही परिस्थिती ते मालकाशी गद्दारी करत नाही”

Story img Loader