Gold at house: एखादी स्त्री सोन्याचे दागिने परिधान करते किंवा गुंतवणूक म्हणून सोन्याची बिस्किटं वगैरे घेतली जातात… पण मध्यप्रदेशातील एका जोडप्याने इंदूरमध्ये त्यांच्या घरात सर्वच वस्तू चक्क सोन्याच्या केल्या आहेत. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. फर्निचर अगदी इलेक्ट्रॉनिक सॉकेटपर्यंत सर्व काही शुद्ध सोन्याने चमकणारं हे घर आहे. इन्स्टाग्राम कंटेंट क्रिएटर प्रियम सारस्वत यांनी मध्य प्रदेशातील इंदूर इथल्या एका अनोख्या निवासस्थानाला भेट दिली. प्रियम सारस्वत हा कंटेंट क्रिएटर भारतातील असाधारण आणि भव्य घरे त्यांच्या अकाउंटवरून दाखवतात. त्यांनी दाखवलेल्या या सोन्याच्या वस्तूंनी भरलेल्या घराचा व्हिडीओ सध्या इंटरनेटचे लक्ष वेधून घेत आहे.

या व्हिडीओची सुरूवात एका १९३६ च्या विंटेज मर्सिडीजसह होते. त्यांचा कारचा संग्रहच आहे. इंदूरमध्ये सहसा कोणती नवीन कार लॉन्च झाली तर ती आपल्याकडे असावीच असा मानस असल्याचे या घरमालकांनी सांगितले. आणि त्याचसोबत अनेक आलिशान वाहनंदेखील दिसत आहेत. त्यानंतर एक गोशाळा देखील त्यांनी केली आहे. पुढे घरात प्रवेश करताना ठिकठिकाणी सोन्याच्या वस्तू दिसतच आहेत. या व्हिडीओत खूप सोनं दिसत आहे असे प्रियमने सांगितले आहे. यावर त्या मूळ मालकाने हे आमचे २४ कॅरेट सोने आहे असे उत्तर दिले. सजावटीपासून ते अगदी इलेक्ट्रिकल सॉकेट्सपर्यंत सगळीकडे सोनंच दिसत आहे.

या घरात एकूण १० बेडरूम आहेत. अगदी प्रशस्त अशा या खोल्या आहेत. या घराच्या भोवतालची अनेक प्रकारची झाडंही आहेत. काही सजावटीसाठीच्या मूर्ती तसंच खुर्च्यादेखील सोन्याच्या आहेत.

“आमच्याकडे २५ जणांच्या कुटुंबासाठी फक्त एक पेट्रोल पंप एवढंच कमाईचं साधन होतं त्यानंतर सरकारी कंत्राटदार म्हणून काम केले सरकारसाठी रस्ते, पूल आणि इमारती बनवणे. आता आमच्या ३०० खोल्यांच्या हॉटेलचे काम सुरू आहे. असा माझा प्रवास आहे”, अशी माहिती या घरमालकाने दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका पेट्रोल पंपापासून ते हॉटेलच्या साम्राज्यापर्यंत हा खरोखर प्रेरणादायी प्रवास आहे अशा कमेंट या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.