Viral Video Shows Life And Competition : आयुष्यसुद्धा एका स्पर्धेप्रमाणेच आहे. कोणताही कठीण प्रसंग समोर आला की, समोरचा किती त्रास देतोय यापेक्षा आणि आपण त्याला कसे सामोरे जातोय हे आवर्जून पाहिले जाते. तर स्पर्धेतसुद्धा जो शेवट्पर्यंत टिकून राहतो त्याचीच प्रशंसा केली जाते, त्यामुळे दुसरा आपल्यापेक्षा चांगला खेळतोय का हे पाहायचे सोडून आपण स्वतः किती त्या स्पर्धेत खरे उतरतोय हे पाहणे तितकेच महत्त्वाचे असते. आपली स्पर्धा ही इतर कोणाशी नसून फक्त आणि फक्त आपल्याशीच असते. तर सोशल मीडियावर असेच काहीसे दाखवणारा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतो आहे; जो अनेकांना प्रेरणा देऊन जाईल एवढे नक्की.

जगात असा एकही माणूस नसतो की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे गुण नसतात. प्रत्येकामध्ये काही ना काही गुण असतात, तर काही ना काही दोष असतात. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या क्षमतेनुसार आयुष्याची स्पर्धा जगत असतो. तर आजचा व्हायरल व्हिडीओ समुद्राचा आहे. दोन बोटी समुद्रातून जाताना दिसत आहेत. दोन्ही बोटींचा वेग एकसारखा आहे. पण, यात स्वतःचा जीव सांभाळून, दोन व्यक्ती बोटीत अगदी स्तब्ध उभे राहून समुद्रातून जाताना दिसत आहेत. कितीही समस्या आल्या तरी अगदी खंबीर राहून त्याचा सामना करायचा असतो, हे दाखवणारा व्हिडीओ एकदा (Viral Video) तुम्हीसुद्धा नक्की बघा…

Young woman threatened suicide did scene in road accused man for making her private video viral
“का केलेस माझे खासगी व्हिडीओ व्हायरल?” तरुणीनं भर रस्त्यात घातला राडा; शेवटी आत्महत्येची धमकी दिली अन्.., पाहा धक्कादायक VIDEO
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Shocking video of snake attacks frog but frog saves himself animal hunting video viral on social media
जिथे भीती संपते तिथे आयुष्य सुरू होतं! सापाने बेडकाला तोंडात धरलं अन् पुढच्याच क्षणी डाव पलटला, पाहा थरारक VIDEO
Video Shows Women Dance On Naino Mein Sapna Song
‘आयुष्य असंच जगायचं असतं…’ ‘नैनो में सपना’ गाणं वाजताच ‘तिनं’ धरला ठेका; व्हायरल VIDEO एकदा नक्की बघा
Railway crossing accident See what happened next when the entire dumper overturned on the car video goes viral
“संपत्ती प्रामाणीकपणाची असेल तर देवही रक्षण करतो” संपूर्ण डंपर कारवर पलटी होणार तेवढ्यात काय घडलं पाहा; VIDEO व्हायरल
Shocking video Sheep Killed A Leopard On Snow Mountain Animal Video goes Viral on social media
शिकारीच झाला शिकार! मेंढीनं केली खतरनाक बिबट्याची शिकार, मरता मरता ५ सेकंदात फिरवला गेम; Video पाहून अंगावर येईल काटा
Shocking video of lion started chasing buffaloes herd for hunt see what happened next thrilling hunting video went viral
VIDEO: “शिकार करो या शिकार बनो” सिंहाची चलाख चाल अन् म्हशीचा शेवट; खतरनाक युद्धात शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
Groom dance on marathi song
VIDEO: “आयुष्य खूप सुंदर आहे फक्त नवरा हौशी पाहिजे” मारवाडी नवरदेवानं बायकोसाठी मराठी गाण्यावर केला खतरनाक डान्स

व्हिडीओ नक्की बघा…

अंगावर शहारा कायम

समुद्राला ललकारू नये, पाण्याशी खेळू नये अशी वाक्य आपण अनेकदा मोठ्यांकडून ऐकली असतील. मच्छीमार समुदायातील लोक याच समुद्राची देवासारखी पूजा करतात आणि आम्हाला सांभाळून घे, अशी प्रार्थना करून भल्या मोठ्या समुद्रात बोटीसह उतरतात. जीवाची पर्वा न करता पाण्यात उतरणे म्हणजे एका धाडसापेक्षा कमी नाही. तसेच काहीसे या व्हायरल व्हिडीओत (Viral Video) पाहायला मिळाले आहे. समुद्रातून निघालेल्या दोन बोटीचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीपासूनच अंगावर शहारा कायम राहतो. कारण भल्यामोठ्या लाटा, बोटीचा वेग, वादळासारखी हवा आणि यात बोटीत अगदी स्तब्ध उभी असलेली दोन माणसे आणि बोट चालवणाऱ्या व्यक्तीचे धाडस बघण्याजोगे आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @pro_capitalmotivation07 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘आयुष्य आणि स्पर्धा..!’ अशी कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिली आहे आणि ‘आयुष्य पण फक्त त्याच खेळाडूंबरोबर खेळते, जे एकमेकांशी स्पर्धा करतात’; असा मजकूरसुद्धा व्हिडीओला देण्यात आला आहे. व्हायरल होणारा प्रत्येक व्हिडीओ काही ना काही संदेश आपल्या सगळ्यांनाच देऊन जातो. तर हा व्हिडीओ आयुष्यात कितीही संकटे आली तरी अगदी न डगमगता त्याला सामोरे गेले पाहिजे असे सांगताना दिसतो आहे.

Story img Loader