मांजरीचा ‘स्पा डे’, मांजरीला ट्रेडमिलवर चालायला शिकवण्याचा प्रयत्न असे बरेच व्हायरल व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. आपण करतो ती प्रत्येक गोष्ट या प्राण्यांना देखील करता यावी हा प्राण्यांच्या पालकांचा प्रयत्न असतो, याचेच अनुकरण त्या घरातील लहान मुलंदेखील करतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली मांजरीला चित्र कसे रंगवायचे हे शिकवत आहे. पण यावर मांजर मात्र थोडी चिडलेली दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये एक चिमुकली मांजरीला चित्र कसे रंगवायचे हे शिकवत आहे. आपण लहान मुलांचा हात धरून जस प्रत्येक गोष्ट शिकवतो, त्याचप्रमाणे ही लहान मुलगी मांजरीचा हात धरून चित्र कसे रंगवायचे हे शिकवताना दिसत आहे. पण मांजरीला हे आवडलेल दिसत नाहीए, कारण ती व्हिडीओमध्ये थोडीशी चिडलेली दिसत आहे. मांजरीची ही प्रतिक्रिया पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल, पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.
आणखी वाचा : नारळातून खोबरं काढण्याची भन्नाट कल्पना; IAS Officer सुप्रिया साहू यांनी शेअर केलेला Video एकदा पाहाच
व्हायरल व्हिडीओ :
व्हायरल होणारा हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओला १ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. मांजरीला चित्र कसे रंगवायचे हे शिकवतानाचे या लहान मुलीचे प्रयत्न आणि त्यावर मांजरीची प्रतिक्रिया या दोन्ही गोष्टींनी नेटकऱ्यांची मनं जिंकली असून, त्यांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.