Viral video: प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यात लोक विनाकारण प्राण्यांवर अत्याचार करतात. लहान-लहान गोष्टींसाठीही कधी कधी प्राण्यांचा छळ करून त्यांना मारले जाते. परंतु, असं असलं तरी सध्या असा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे तुम्ही पाहू शकता.

आजकाल इथे माणसांना माणसांची काळजी घ्यायला वेळ नाही, रस्त्यात एखाद्याचा अपघात झाला तरी लोक त्याच्या मदतीसाठी थांबत नाहीत, मग अशात प्राण्यांची काळजी कोणाला आहे? त्यांचा विचार फारच कमी लोक करताना दिसतात. परंतु, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एका दयाळू माणसानं सरड्याला वाचवलं आहे. एवढंच नाही तर त्यानं चक्क सरड्याला वाचवण्यासाठी तोंडाने दिला CPR दिला. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

VIDEO चा शेवट पाहून व्हाल अवाक्

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक सरडा जमिनीवर पडला आहे, कुणालाही पाहून सरडा मेला आहे असंच वाटेल. मात्र, एका तरुणानं त्याला जवळून पाहिलं असता तो जिवंत असल्याचं त्याला कळलं आणि त्याने सरड्याला वाचवण्यसाठी प्रयत्न सुरू केले. त्याने सुरुवातीला त्याच्या शरीरावर पाणी टाकलं. त्याला हलवलं. हे सगळं करूनही सरडा काही हालचाल करत नसल्यानं तरुणाने शेवटी सरड्याला स्वत:च्या तोंडाने श्वास द्यायला सुरुवात केली. व्हिडीओ पाहूनच अंगावर काटा येतो. त्यामुळे या तरुणाने दाखवलेली हिम्मत उल्लेखनीय आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> रस्ता ओलांडताना भीषण अपघात; कारचे चाक वृद्ध महिलेच्या छातीवरुन गेले अन्… अपघाताचा थरार CCTVत कैद

सुरुवातीला हताश झालेला तरुण आनंदी होतो, कारण सरडा अचानक हालचाल करायला लागतो. मग तरुण त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न करतो. यानंतर सरडा हळूहळू हालचाल करू लागतो. व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे तरुण या सरड्याला घरी घेऊन गेला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ @TheFigen_या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी या तरुणाचं कौतुक केलं आहे. अजूनही माणुसकी जिवंत असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.