प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चढ-उतार हे असतात. सुख-दुखांचा सामना करतच आपल्याला आयुष्य जगावे लागते. काही लोकांना आयुष्यभर प्रचंड संघर्ष करावा लागतो. प्रत्येकासाठी हा संघर्ष वेगळा असतो. आपल्या आसपास अनेक लोक असे असतात जे संघर्ष करून आपले आयुष्य जगत असतात. त्यांचा संघर्ष पाहिल्यानंतर आपल्याला करावा लागणारा संघर्ष काहीच नाही असे आपल्याला वाटते. अनेकदा असे लोक इतका संघर्ष करूनही आपले आयुष्य आनंदाने जगत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक दिव्यांग तरुणी नाचताना दिसत आहे. तरुणींचा व्हिडीओ पाहून तुम्ही थक्क व्हाल.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक दिव्यांग तरुणी दिसत आहे जिच्या हातात कुबड्या आहेत. ही तरुणी कुबड्यांचा आधार घेऊन बिनधास्तपणे नाचताना दिसत आहे तरुणीन नाचताना गिरक्या घेत आहे. अवघड स्टेप्सही अगदी सहज करत आहे. एक क्षण असा येतो की एकाच कुबडीच्या आधारे उभी राहून नाचते. शिट्या वाजवते.. तिचा उत्साह आणि आनंद पाहून तुम्ही थक्क होऊन जाल. तरुणीचा व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावरही हसू येईल.

हेही वाचा – प्राण्यांनाही कळते प्रेमाची भाषा! चिमुकल्या बाळासह खेळताना दिसले हरणाचे पाडस; गोंडस व्हिडीओ एकदा बघाच

ही तरुणीने अनेकांना आनंदी राहण्यासाठी प्रेरणा देत आहे. आयुष्यात कितीही संकट आले किंवा कितीही संघर्ष असला तरी आनंदी कसे राहावे हे तिच्याकडून सर्वांनी शिकले पाहिजे. इंस्टाग्रामवर ann_talkies नावाच्या अकांउटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तरुणीचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडला आहे. व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले, “या तरुणीने सिद्ध केले की सर्व काही शक्य आहे” दुसऱ्याने लिहिले की, अतिशय सुंदर डान्स, किती गोड आहे ती, अत्यंत हुशार आहे.”

हेही वाचा – विद्यार्थ्यांना शिकवण्याची अनोखी युक्ती! नागालँडचे मंत्री VIDEO शेअर करीत म्हणाले, ‘प्रत्येक शाळेत असा शिक्षक…’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिसऱ्या व्यक्तीने लिहिले,”माझ्या आयुष्यात पाहिलेला सर्वात सुंदर डान्स” चौथ्याने लिहिले की, “सुंदर डान्स केलास”, पाचव्याने लिहिले की, “हे पाहिल्यानंतर मी खरोखरच अवाक झालो आहे, मला कळत नाही की, काय लिहावे. तिच्याकडे खूप आत्मविश्वास आहे त्याचे करावे तितके कौतुक कमीच आहे. ती देशासाठी एक आदर्श आहे. “