Viral video: भारतात गाड्या आणि त्यामागील स्लोगन खूप व्हायरल होतात. ट्रकच्या, कारच्या, रिक्षाच्या मागे वेगवेगळ्या प्रकारच्या पाट्या पाहून हे सगळे ट्रक पुण्याचेच आहेत की काय असाही प्रश्न पडतो.‘मेरा भारत महान’ आणि हॉर्न ओके तर जवळजवळ प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेलंच असतं. याशिवाय काही ट्रकवाल्यांच्या आत लपलेली कला याच ठिकाणी दिसून येते. जसं की ‘शेरो शायरी, म्हणी, टोमणे, मोटीवेशनल कोट यांसारखे दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणून पण गाड्यांच्या मागे अशी वाक्य लिहिणे हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रस्त्यावरील प्रवासादरम्यान आपल्या बहुतेक वेळा ट्रक, टेम्पो, रिक्षा दिसत असतात. रिक्षाचालक आपल्या रिक्षावर वेगवेगळे संदेश लिहतात. त्यांच्या मागे लिहिलेले काही डायलॉग्स किंवा शायरी असो. रोड ट्रिपदरम्यान याची मजा काही औरच असते. दरम्यान अशाच एका रिक्षाच्या मागची अशीच एक पाटी व्हायरल होत आहे जी पाहून तुम्हीही भावूक व्हाल.

बाप आणि मुलाचं नातं हे वरून शांत दिसत असलं तरी ते नातं मुळापासून नेहमी घट्ट असतं. बाबा हा आपल्या मुलांसाठी काहीही करू शकतो. तो एकाच नात्यात हजारो नाती लेकरांसाठी निभावत असतो. आयुष्यात कितीही मोठ्या संकटाची लाट येऊ देत; बाबा हा किनाऱ्यासारखा भक्कम उभा असतो. आपल्या एका हाकेवर येणारा, आपण सांगण्याआधीच त्याला आपल्याला काय हवंय हे कळंत. अशावेळी या रिक्षाच्या मागे लिहलेली पाटी पाहून सगळ्यांनाच आपल्या वडिलांची आठवण येतेय.

“कोणताही नवस न करता पावणारा देव म्हणजे बाप”

आता तुम्ही म्हणाल असं काय लिहलंय? तर या व्हिडीओमध्ये तम्ही पाहू शकता, मागून येणाऱ्या कारमधल्या व्यक्तीनं हा व्हिडीओ काढला आहे. यावर “कोणताही नवस न करता पावणारा देव म्हणजे बाप” असं लिहलं आहे. याचं कारण असं की परिस्थितीमुळे आलेली जबाबदारी. कदाचीत हा रिक्षा मालकही याच परिस्थितीतून कधीकाळी गेला असावा म्हणून त्यानं अशाप्रकारे पाटील आपल्या रिक्षाच्या मागे लावली.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Photo: “प्रेम ही एक क्षणिक भावना” प्रत्येक बापानं वयात येणाऱ्या मुलाला लिहावं असं पत्र; नक्की वाचा

हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ek_puneri या इन्स्टाग्राम अकाऊंटवरन शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओला लोक खूप पसंत करत आहेत. अनेक लोक त्यावर कमेंटही करत आहेत.या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Puneri pati viral there is no love like father emotional slogan written behind puneri riksha video goes viral on social media srk