Viral Video : उद्या ‘गणेश चतुर्थी’निमित्त अनेकांच्या घरी गणरायाचे आगमन होणार आहे आणि सगळीकडेच जल्लोष सुरू आहे. गणेशोत्सवादरम्यान अनेकदा मंडळाचे सदस्य वर्गणी मागायला दारात येतात. काही मंडळांतील सदस्य अगदी मिळेल तेवढी वर्गणी स्वीकारतात; तर काही मंडळांचे सदस्य पावतीचे बुक घेऊन ‘अमुक वर्गणी हवी’, अशी मागणी करतात. अशातच काहींची आर्थिक परिस्थिती बिकट असेल किंवा त्यांना घरखर्चापायी वर्गणी देणे शक्य नसते. तर आज सोशल मीडियावर याचसंबंधी एक व्हिडीओ पाहायला मिळाला आहे; जे पाहून तुमचं मन नक्कीच भरून येईल.

सुकलेल्या गवतापासून तयार केलेल्या घरात एक कुटुंब राहत असते. बाबा, चिमुकला आणि आजी राहणाऱ्या घराची परिस्थिती थोडी बिकट असते. चिमुकला बाबांकडे काहीतरी खायला मागतो; तर बाबा चुलीकडे वळतात आणि भांड्यात जेवायला जेवण आहे का बघत असतात. तितक्यात काही तरुण मंडळी वर्गणी मागण्यासाठी दारात येऊन उभे राहतात आणि अज्ञात व्यक्तीकडे बघून वर्गणी, असे म्हणतात. अज्ञात व्यक्ती थोडी गोंधळते आणि पैसे शोधायला सुरुवात करते. तितक्यात वर्गणी मागायला आलेल्या तरुण मंडळींतील एक मुलगा लगेच म्हणतो, ‘अहो, वर्गणी मागायला नाही घ्यायला नाही; द्यायला आलो आहे.’ ते व्यक्तीच्या हातात काही पैसे देतात आणि निघून जातात. आणि त्या कुटुंबातील व्यक्ती देवापुढे हात जोडते. व्हिडीओचा शेवट अगदी सगळ्यांनाच चकित करणारा आहे. हा व्हिडीओ तुम्हीसुद्धा एकदा बघाच…

हेही वाचा…VIDEO : “नाव घ्या नाव घ्या.. हा काय कायदा…” नवरदेवाने उखाणा विचारणाऱ्यांची केली बोलती बंद, पाहा मजेशीर व्हिडीओ

व्हिडीओ नक्की बघा :

एक वर्गणी अशीही :

संकटाच्या काळात अनेकदा पैशांची गरज भासते. तेव्हा आपण इतरांकडे पैसे मागायला डगमगतो. पण अशातच परिस्थिती समजून घेऊन, शेजारी किंवा मित्र-मैत्रिणींच्या नकळत आपली मदत करून जातात. याच गोष्टीला अनुसरून हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. अज्ञात कुटुंबाची परिस्थिती बघून मंडळातील तरुण मंडळी वर्गणीचे पैसे न मागता, मंडळाकडे जमा झालेले पैसे कुटुंबाला देताना दिसून आले आहेत. हा व्हिडीओ मनोरंजनाच्या दृष्टीने बनवण्यात आला असला तरीही या व्हिडीओतील संदेश प्रत्येक माणसाच्या हृदयापर्यंत पोहोचला असेल एवढं नक्कीच.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियाच्या काही इन्फ्लुएन्सर यांनी हा व्हिडीओ शूट केला आहे. @rushiaiwale यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून, ‘एक वर्गणी अशीपण’ अशी खास कॅप्शन दिली आहे’. अनेक जण व्हिडीओ पाहून, ‘एक चांगला संदेश दिला’, ‘व्हिडीओ बघून डोळ्यात पाणी आलं’, ‘खूप छान! सगळ्याच मंडळांनी असं केलं तर’, ‘शेवट अनपेक्षित होता’ अशा विविध भावना कमेंटमध्ये व्यक्त होताना दिसून येत आहेत.