Viral Video: सोशल मीडियावर कधी कुठलं गाणं व्हायरल होईल हे सांगता येत नाही. जेव्हापासून रील्स बनविण्याचा ट्रेंड सुरू झाला तेव्हापासून सतत विविध भाषांतील विविध देशांतील नवनवीन गाणी व्हायरल होत असतात; ज्यावर लाखो लोक रील बनवतात. इतकेच नव्हे, तर ही गाणी अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही लावली जातात. नुकतंच काही दिवसांपूर्वी ‘पुष्पा : द रुल’ या आगामी चित्रपटातील ‘पुष्पा पुष्पा’ हे गाणं प्रदर्शित झालं होतं; जे सध्या खूप चर्चेत असून, या गाण्यातील हुक स्टेपची अनेकांना भुरळ पडली आहे. या गाण्यावर लाखो लोक रील्स बनवून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. फक्त सामान्य लोकच नाही, तर अनेक दिग्गज कलाकारांनीही या गाण्यावर रील्स तयार केल्या आहेत. अशातच आता या गाण्यावरील डान्सचा नवा व्हिडीओ समोर आला आहे; जो पाहून प्रत्येक जण या डान्सचं कौतुक करताना दिसत आहे.

‘पुष्पा : द रुल’ चित्रपटाच्या पहिल्या भागामधील गाण्यांनीदेखील अनेकांना वेड लावलं होतं. या गाण्यांतील अनेक हुक स्टेप्सदेखील सोशल मीडियावर खूप व्हायरल झाल्या होत्या. दरम्यान, आता ‘पुष्पा : द रुल’ चित्रपटातील ‘पुष्पा पुष्पा’ गाण्यातील एक हुक स्टेप सध्या खूप व्हायरल होतेय. समोर आलेल्या या व्हिडीओमध्येही काही तरुण या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @name_is_djmadhu या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तुम्ही यामध्ये पाहू शकता की, काही तरुण आणि काही लहान मुलं या गाण्यावर डान्स करीत आहेत. त्याशिवाय त्यांच्यातील एक तरुण या डान्सला लीड करीत असून, तो दुरून पाहिल्यावर अगदी अल्लू अर्जुनसारखा दिसत आहे. हे सगळे मिळून ‘पुष्पा पुष्पा’ गाण्यातील हुक स्टेप करीत आहेत. या व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरीदेखील त्यांचे कौतुक करीत आहेत.

हेही वाचा: शाळा आहे की पार्लर? विद्यार्थिनीकडून वॉचमेन घेतोय फेस मसाज; Viral Video पाहून नेटकरी संतप्त

पाहा व्हिडीओ:

या व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत दोन मिलियनहून अधिक व्ह्युज आणि दीड लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर युजर्सही अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यात एकानं लिहिलंय, “एकदम खतरनाक डान्स.” तर आणखी एकानं लिहिलंय, “लोकल पुष्पराज.” तर आणखी एका व्यक्तीनं लिहिलंय, “पुष्पाचा डुप्लिकेट सापडला.”