Viral Video: लोकांमध्ये प्राण्यांबद्दल प्रेम, सहानुभूती नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः कुत्रा हा अनेकांचा लाडका प्राणी आहे. पण, समाजात असेही काही लोक असतात; ज्यांना प्राण्यांचा तिरस्कार वाटतो आणि त्यातून ते त्यांची हत्या करतात, त्यांना अमानुष मारहाण करतात. सोशल मीडियावर अनेकदा याबाबतचे धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात; जे पाहून युजर्स मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करतात.

नुकताच काही दिवसांपूर्वी गुजरातमधील एक व्हिडीओ समोर आला होता; ज्यात दोन तरुणांनी एका भटक्या कुत्र्याला ५० फूट उंचावरून खाली फेकलं होतं. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी खूपच मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला होता. दरम्यान, आतादेखील असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यात एका वाहनचालकानं असं काहीतरी केलंय, जे पाहून तुम्हालाही संताप येईल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका रस्त्याच्या एका बाजूला काही गाड्या पार्क केलेल्या दिसत आहेत आणि दुसऱ्या बाजूचा रस्ता पूर्णपणे मोकळा आहे. त्यावेळी एक कुत्रा त्या मोकळ्या रस्त्यावर झोपलेला दिसत आहे. काही वेळानंतर तिथे एक चार चाकी गाडी येते, काही वेळ ती गाडी चालविणारी व्यक्ती गाडी वळवते आणि अचानक त्या कुत्र्याच्या अंगावरून गाडी घेऊन जाते. या व्हिडीओत कुत्र्याला पाहूनही त्या व्यक्तीनं मुद्दाम कुत्र्याच्या अंगावरून गाडी घेऊन नेल्याचे दिसत आहे. वाहनचालकाच्या या क्रूर कृत्यामुळे सोशल मीडियावर युजर्स खूप मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

हा व्हायरल व्हिडीओ X (ट्विटर)वरील @Ghar Ke Kalesh या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत तीन लाखांहून अधिक व्ह्युज आणि एक हजारहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर अनेक नेटकरी कमेंट्स करतानाही दिसत आहेत. एकानं लिहिलंय, “त्यानं हे मुद्दाम केलं आहे. त्याच्या कर्माची शिक्षा त्याला नक्कीच मिळणार.” दुसऱ्यानं लिहिलंय, “सध्या अशा घटना खूप कॉमन आहेत. असे चालक अलीकडे हे जाणूनबुजून करतात.” आणखी एकानं लिहिलंय, “खूप धक्कादायक.. का? असं मुद्दाम करताय.” तर आणखी एकानं लिहिलंय, “खूप वाईट केलं त्यानं”

हेही वाचा: याला म्हणतात मराठमोळा डान्स! नऊवारी नेसून गुलाबी साडी गाण्यावर महिलांनी धरला ठेका

पाहा व्हिडीओ:

दरम्यान, याआधीदेखील एका व्यक्तीनं लिफ्टमध्ये कुत्र्याला मारहाण केली होती; ज्याचे सीसीटिव्ही फुटेज व्हायरल झाले होते. या व्हिडीओमध्ये त्या व्यक्तीनं खूप अमानुष पद्धतीनं कुत्र्याला मारलेलं पाहून युजर्सनी खूपच संताप व्यक्त केला होता.