सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही आपणाला थक्क करणारे असतात तर काही आपलं मनोरंजन करणारे असतात. सध्या असाच एका विमानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण होत आहे, तर अनेकजण या ठिकाणी विमान आलंच कसे या विचारात पडले आहेत. हो कारण आजपर्यंत तुम्ही विमानाशी संबंधित अनेक व्हिडीओ पाहिले असतील. यातील काही विमान अपघाताचे अनेक व्हिडीओ इतके धक्कादायक असतात की पाहून अंगावर शहारा येतो. पण सध्या व्हायरल होणारा विमानाचा व्हिडीओ थोडा वेगळा आहे. कारण या व्हिडिओमध्ये पायलटने विमानाचा लॅंडिंग थेट चिखलात केल्याचं पाहायला मिळत आहे. तर चिखलात अडकलेल्या विमानाला बाहेर काढण्यासाठी अनेक लोक जमा झाल्याचंही व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

पायलटने चिखलात केलं विमानाचं लॅंडिंग –

पायलटने विमान चिखलात उतरवल्याचं व्हिडिओत विमानाच्या आसपास अनेक लोक विमान बाहेर काढण्यासाठी जमा झाल्याचे दिसत आहेत. यावेळी जेसीपीच्या साह्याने विमान बाहेर काढण्याचाही प्रयत्न सुरु असल्याचं दिसत आहे, पण काही केल्या विमान चिखलातून बाहेर काढता येत नसल्याचंही पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ कधीचा आणि कुठला आहे याबाबत कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, हा व्हिडिओ पाहून अनेकजण मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. शिवाय हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअरदेखील करत आहेत.

व्हिडिओ झाला व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चिखलात विमान लॅंडिग केल्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर harishdahiyakkd नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत ५ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. शिवाय हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर या पायलटला १०८ तोफांची सलामी दिली पाहिजे असे म्हटलं आहे, तर एका वापरकर्त्याने लिहिले की, हा कप हेवी पायलट निघाला. तर दुसऱ्या एकाने कमेंटमध्ये लिहिलं, “व्हिडीओ पाहिल्यानंतर असे वाटते की हा पायलट आधी ट्रॅक्टर ड्रायव्हर असावा, म्हणूनच त्याने अशा ठिकाणी विमान लॅंड केलं.”