Truck Driver Stunt Video: आपण सिनेमांमध्ये अनेक वेळा स्टंटबाजी करताना पाहिली असेल; पण ते स्टंट खूप काळजी घेऊन केले जातात. सिनेमाची गोष्ट सोडली, तर आता अनेक जण सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी तर काही व्ह्युज, लाइक्ससाठी स्वत:चा जीव धोक्यात घालतात आणि स्टंट करतात. हे स्टंट इतके धोकादायक असतात की ते जीवावरही बेतू शकतात. तर अनेकदा स्टंटबाजीमध्ये अनेकदा त्यांचा जीवदेखील जातो.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले असे अनेक स्टंट्स आपण पाहिलेच असतील. पण सध्या एक असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक ट्रकचालक स्वत:चाच जीव धोक्यात घालताना दिसतोय. नेमकं काय घडलंय, जाणून घेऊ या…

ट्रक ड्रायव्हरचा स्टंट (Truck Driver Viral Video)

ड्रायव्हरचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये ट्रक चालक धोकादायक स्टंट करताना दिसतोय. ट्रक चालवत असताना ट्रकचालक स्टेअरिंग सोडतो, आणि धावत्या ट्रकमधून बाहेर पडतो. चालक एका दरवाजातून उतरून आणि ट्रकच्या बाहेरील काचेवरून पुन्हा दुसऱ्या दरवाजाने आत शिरतो. हे सगळं तो ट्रक सुरू असतानाच करतो.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @parivartan_news या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल ६ लाखांपेक्षा मिलियन व्ह्यूज आले आहेत. तसंच “बघा त्याने किती धोकादायक कृत्य केलं, त्याचं ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करायला हवं⁠” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप कळू शकलं नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “याला ड्रायव्हर म्हणणेच चुकीचे आहे”, तर दुसऱ्याने “याच रिल्समुळे मोठी घटना घडली असती, याचं लायसन्स जप्त करावं व ५ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा द्यावी” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “याच्यावर कारवाई करा, अशा लोकांमुळेच अपघात होतात” तर एकाने “आयुष्याचा असा खेळ करू नका” अशी कमेंट केली.