Viral Video : पुणे हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक शहर आहे. येथील संस्कृती, ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, भाषा या शहराचा इतिहास सांगतात. येथील ऐतिहासिक ठिकाणे, गडकिल्ले, खाद्यपदार्थ तसेच पुणेरी पाट्या इत्यादी अनेक कारणांमुळे हे शहर अतिशय लोकप्रिय आहे. पुणे म्हटलं की पुणेरी बाणा. पुणेकरांची एक विशिष्ट जीवनशैली, विचारशैली, वागण्याची आणि बोलण्याची पद्धत, आत्मविश्वास, बोलण्यात अतिस्पष्टता, टोमणे, सुचना इत्यादी गोष्टींतून पुणेरी वृत्ती डोळ्यासमोर येते. असं म्हणतात, पुणेकर कधी काय बोलतील सांगता येत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक आजोबा मेट्रोने प्रवास करत आहे. एक तरुण जेव्हा त्यांना मेट्रोने प्रवास करून कसं वाटतं, असा प्रश्न विचारतो तेव्हा ते त्यावर पुणेरी शैलीत भन्नाट उत्तर देतात. आजोबा काय उत्तर देतात, यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

हा व्हायरल व्हिडीओ मेट्रोतील आहे. हल्ली अनेक तरुण मंडळी सोशल मीडियावर मेट्रोतील व्हिडीओ शेअर करत असतात. असाच एक तरुणाने एका आजोबांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना मेट्रोनी प्रवास करून कसं वाटतं, हे तो व्हिडीओत रेकॉर्ड करणार होता.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक आजोबा मेट्रोनी प्रवास करताना दिसत आहे. तितक्यात हा तरुण त्यांना विचारतो, “मेट्रोमध्ये प्रवास करून कसं वाटतं सर तुम्हाला?” त्यावर आजोबा भन्नाट उत्तर देतात आणि म्हणतात, “आताच बसलोय. परत या.. परत या” आजोबांनी पुणेरी वृत्ती दाखवत तरुणाला उत्तर दिले. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल.

पाहा व्हायरल व्हिडीओ

heypuneofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुणे तिथे काय उणे. आजोबा रॉक्स. कमीत कमी शब्द जास्तीत जास्त अपमान करून मिळेल स्थळ – पुणे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कमीत कमी शब्द जास्तीत जास्त अपमान करून मिळेल स्थळ – पुणे” तर एका युजरने लिहिलेय, “खरा पुणेकर” आणखी एका युजरने लिहिलेय, “ही सगळी पेठ्यात असलेली असं करतात” एक युजर लिहितो, “याच कारणामुळे मला पुणे शहर खूप आवडते” तर एक युजर लिहितो, “तो जाऊन येईल तो पर्यंत आजोबा सांगायला राहिले असतील का?” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.