Viral Video : गडकिल्ले ही महाराष्ट्राची ओळख आहे. हे गडकिल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाचा हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. अनेक गडकिल्ले आता पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. या गडकिल्यांना दरदिवशी अनेक पर्यटक भेट देतात. या गडकिल्ल्यांचा इतिहास जाणून घेतात आणि सुंदर निसर्गाचे दर्शन घेतात. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या या गडकिल्ल्यांचे संरक्षण करणे किंवा ते गडकिल्ले स्वच्छ सुंदर ठेवणे, हे आपले कर्तव्य आहे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही कचर टाकण्यापूर्वी दहा वेळा विचार कराल.

हा व्हायरल व्हिडीओ रायगडावरील आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक व्यक्ती कचऱ्याचं मोठं पोतं डोक्यावर वाहून नेत गडावरून खाली नेत आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं हे पोतं कशाचं आहे? तर हे ओझं कचऱ्याचं आहे. पर्यटक गडावर जो कचरा करतात तो कचरा गोळा करून ही व्यक्ती डोक्यावर उचलून खाली नेत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, ” किल्ल्यावर कचरा टाकताना ही रिल नक्की आठवा”

अनेक पर्यटक गडकिल्ल्यांवर कचरा टाकतात पण पर्यटकांच्या बेजबाबदारपणामुळे किल्ले परिसरात अस्वच्छता परसते. किल्ल्यांवरील कचरा जमा करून खाली आणण्यासाठी या व्हिडीओत दाखवलेल्या काकांसारख्या लोकांना नंतर प्रचंड परिश्रम घ्यावे लागते. पण ही फक्त त्यांची जबाबदारी नाही. एक सुजाण नागरिक म्हणून गडकिल्ल्यांवर स्वच्छता राखणे, हे आपले कर्तव्य आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

mahesh_koli_mavala_sahyadricha या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कोणत्याही किल्ल्यावर कचरा टाकण्यापूर्वी तो कचरा साफ करताना किती त्रास होतो याचा विचार करा. जे लोक गड किल्ल्यावर पाणी बाटली किंवा अन्य काही प्लास्टिक वस्तू घेऊन जात असाल तर ती कृपया परत खाली घेऊन या, ही नम्र विनंती.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कचरा करणाऱ्यांनी गड फिरायला जाऊ नये ” तर एका युजरने लिहिलेय, “एवढा कचरा करायला जाऊच नका ना कुणी अडवलंय” आणखी एका युजरने लिहिलेय, “महाराजांवर प्रेम आदर असेल तर कचरा करु नका प्लीज ह्या वृध्द काकांचा विचार करा, कोणाला त्रास होईल असे महाराज वागले नाहीत”
अनेक युजर्सनी या व्हिडीओवर संताप व्यक्त केला आहे.