Viral Video: सोशल मीडियावर सतत विविध व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात. त्यात अनेकदा प्राण्यांचे व्हिडीओदेखील असतात. या व्हिडीओंमध्ये कधी हिंस्र प्राणी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात; तर कधी हेच प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात. शिकारीच्या व्हिडीओंमुळे आपला नेहमीच थरकाप उडतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय; ज्यात पाणघोडा सिंहावर हल्ला करताना दिसत आहेत.

सिंहाला जंगलाचा राजा म्हटले जाते. सिंह, वाघ, बिबट्या यांसारखे हिंस्र प्राणी जंगलातील इतर प्राण्यांवर अनेकदा हल्ला करताना दिसतात. त्यामुळे इतर प्राणी नेहमीच त्यांना घाबरून असतात. काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता; ज्यात सिंहाच्या दोन शावकांनी एका पाणघोड्यावर भयानक हल्ला केला होता. पण, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये वेगळंच दृश्य पाहायला मिळत आहे; ज्यात एक पाणघोडा सिंहावर हल्ला करताना दिसत आहे. या व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जंगलातील एका नदीमध्ये तीन सिंह पोहण्याचा आनंद घेत आहेत. यावेळी अचानक एक पाणघोडा तिथे येतो आणि त्यातील एका सिंहावर हल्ला करतो. यावेळी तो सिंह स्वतःला पाणघोड्याच्या तावडीतून सोडवून घेऊन पळून जातो. यावेळी पाणघोड्याला पाहताच उर्वरित दोन सिंहदेखील दूर पळून जातात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे.

हेही वाचा: ‘गुलाबी साडी’ गाण्यावर चिमुकलीचे हटके एक्स्प्रेशन आणि डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ X(ट्विटर)वरील @Nature is Amazing या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये, “पाणघोडा पाण्यातून इतक्या वेगाने फिरू शकतो हे खूप भयानक आहे. तसेच, मी आतापर्यंत पहिल्यांदाच सिंहाला एवढे घाबरलेले पाहिले आहे.” या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास नऊ लाखांहून अधिक व्ह्युज आणि १० हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हायरल व्हिडीओवर अनेक नेटकरी कमेंट्स करतानाही दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय, “पाणघोडा हा एक अतिशय आक्रमक वन्य प्राणी आहे आणि पृथ्वीवरील सर्वांत प्राणघातक मोठा सस्तन प्राणी आहे. असा अंदाज आहे की, आफ्रिकेत दरवर्षी पाणघोड्याच्या हल्ल्यामुळे ५०० लोक मरण पावतात.” तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “पाणघोडा हा अतिशय आक्रमक प्राणी आहे.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “आमची फसवणूक झाली आहे. पाणघोडा जंगलाचा राजा असायला हवा होता; सिंह नाही.”