Viral Video Kedarnath Snow Fall: केदारनाथ मध्ये मागील १० दिवसात हिमस्खलन झाल्याची घटना घडली आहे. केदारनाथ मंदिराच्या जवळ चोराबारी हिमपर्वतावरून शनिवार सकाळी बर्फाचे मोठे थर कोसळताना दिसले. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिमस्खलनानंतर आता जिल्हा प्रशासनाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धोक्याच्या ठिकाणी पोलिसांची तुकडी सज्ज करण्यात आली असून तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी आलेल्या भाविकांनाही सतर्क राहण्याचा साला देण्यात आला आहे. बर्फ कोसळतांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे सलग १० दिवसातच दुसऱ्यांदा अशी घटना घडणे हे एखाद्या संकटाची चाहूल असल्याचे भाविकांनी म्हंटले आहे.

प्राप्त माहितीनुसार २०१३ मध्ये केदारनाथ येथील चोराबारी या हिमपर्वताचा काही भाग ढासळल्याने मंदाकिनी नदीच्यापात्रात पूर आला होता, यात अनेकांचे दुर्दैवी निधन झाले होते. यानंतर केदारनाथ मधील तब्बल ३२९ धोकादायक ओढ्यांमध्ये सेन्सर लावण्यात आले होते जेव्हा नदी पात्रातील पाण्यात वाढ होईल तेव्हा या छोट्या ओढ्यांमधील सेन्सर प्रशासनाला सूचित करतील व पाणी उपसून काढण्याची प्रक्रिया लवकर सुरु करता येईल अशी प्रणाली इथे तयार करण्यात आली आहे.

केदारनाथ मध्ये हिमपर्वत ढासळला व्हिडीओ

बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी आज सकाळी घडलेल्या या घटनेची पुष्टी केली, सुदैवाने यामध्ये कोणत्याही भाविकाला इजा झालेली नाही असेही अजय यांनी सांगितले. सकाळी पाच वाजल्याचा सुमारास हे हिमस्खलन झाले होते हा चोराबारी पर्वत मुख्य मंदिर परिसर्पून ५ किमी दूर आहे. अद्याप मंदाकिनी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली नसल्याने चिंतेचे कारण नाही असे मंदिर प्रशासन व पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तराखंडमध्ये पुढील काही दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाच ते ९ ऑक्टोबर दरम्यान मोठा पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान याकाळात मंदिरात दर्शन सुरु असेल मात्र भाविकांनी खबरदारी बाळगणे गरजेचे आहे असे मंदिराकडून सांगण्यात आले आहे.