आयुष्य हे खूप सुंदर आहे ते आनंदाने जगता आले पाहिजे. अनेकदा चढ-उतार येतात पण म्हणून कोणी हार मानायची नसते. अनेकदा लोक आयुष्याला कंटाळून जीव देतात तर लोक विनाकारण आपला जीव धोक्यात टाकतात. कधी स्टंट करण्याच्या नादाच जीव धोक्यात टाकतात तर कधी नैराश्यामध्ये टोकाचे पाऊल उचलताना दिसता. पण आयु्ष्य म्हणजे खेळ नाही. एकदा जीव गेला तर तो परत येत नाही. त्यामुळे आयुष्याची आणि आयुष्यातील प्रत्येक क्षणाची किंमत केली पाहिजे. सोशल मीडियावर एक अतिशय भयानक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एका उंच इमारतीच्या २५ व्या मजल्यावरील बाल्कनीच्या टोकावर एक तरुण धोकादायकपणे बसलेला दिसत आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील नोएडा पश्चिम भागातील गौर शहरातील १४ व्या अव्हेन्यू सोसायटीचा असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या काळजात धस्स होत आहे.
असे मानले जाते की, हा व्हायरल फुटेज या महिन्यातील आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये २५ व्या मजल्यावरील बाल्कनीच्या टोकावर एक तरुण बसलेला दिसत आहे. व्हिडिओमध्ये बाल्कनीवर रेलिंग नसल्याचे दिसून येते आणि तो तरुण पाय मोकळे सोडून तिथे बसलेला दिसत आहेत. व्हिडिओ पाहून असे वाटते की, “त्या माणसाला खाली पडण्याची भीती नव्हती.” इतक्या उंचीवरून पडल्यानंतर वाचण्याची शक्यता कमी आहे हे माहित असूनही, तो तरुण बिनधास्तपणे बसलेला दिसतो आहे. व्हिडिओ पाहून असे दिसते की, त्याला तो कोणत्या धोक्यात आहे याची कल्पना नाही.”
घटनेच्या वेळी तो तरुण दारूच्या नशेत होता, असा दावा केला जात आहे, ज्यामुळे त्याला भीती वाटत नव्हती हे स्पष्ट होते. @SachinGuptaUP या हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करताना सचिन गुप्ता नावाच्या एका एक्स वापरकर्त्याने कॅप्शन दिले आहे की, “मूड खराब झाल्याने नशेत एक माणूस २५ व्या मजल्याच्या बाल्कनीच्या टोकावर बसला.” त्याच्या मते हा व्हिडिओ ग्रेटर नोएडा वेस्ट परिसरातील एका उंच इमारतीतील सोसायटीचा आहे. दुसऱ्याने दावा केला आहे की,”ही घटना १४ व्या अव्हेन्यू सोसायटीतील आहे.
व्हिडिओ पाहिल्यानंतर, एका वापरकर्त्याने टोला लगवाला की, “कदाचित त्याच्या मैत्रिणीने त्याला फसवले असेल, म्हणून तो त्याचे दुःख विसरण्यासाठी येथे बसला असावा.” दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, “या माणसाला मानसोपचारतज्ज्ञाची गरज आहे.” दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली, “तो स्वतः दारू पिऊन गेला, पण त्रास इतरांना देत होता.” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “किती भयानक दृश्य आहे, ते पाहूनच मी थरथर कापत आहे.”
हा व्हिडिओ दोन दिवस जुना असल्याचे मानले जात आहे. मात्र, या घटनेपासून समाजात दहशतीचे वातावरण आहे.