Viral Video Of Police Officer : कित्येकदा स्वत:ची गाडी असणे प्रवासाच्या दृष्टीने सोईस्कर ठरते; पण, स्टाईल म्हणून नव्हे, तर वाहतुकीचे नियम लक्षात ठेवून गाडी चालवली पाहिजे. आपल्यातील अनेक जण बेपर्वाईने वाहन चालवून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतात. मग वाहतूक पोलिस व पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत या गोष्टी जातात आणि आपल्याला दंड भरावा लागतो. पण, आज सोशल मीडियावर एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले आहे. त्यात पोलीस अधिकाऱ्याचे प्रेमळ रूप दिसले आहे.

व्हायरल व्हिडीओत बाबा आपल्या दोन चिमुकल्या मुलींबरोबर बाईकवरून प्रवास करताना दिसत आहेत. यादरम्यान सिग्नल लागतो आणि पोलीस अधिकारी बाबांची बाईक थांबवतात. त्यानंतर पुढे बसलेल्या चिमुकलीला ‘कुठे चालली?’ असे लाडाने विचारतात आणि दोन्ही मुलींना गुलाबाचे फूल देतात. त्यानंतर मागे बसलेल्या लेकीला, “पप्पांना सांग, असेच हेल्मेट घालून रोज गाडी चालवायची आणि हळू गाडी चालवायची. चिमुकलीला पुढे नको; मागे बसवा’, असे तो अधिकारी काळजीपोटी सांगत व्हिडीओचा शेवट होतो.

जिथे मुली असतात तिथे आनंद नक्कीच पसरतो (Viral Video)

आपण बाईक, कारमधून जेव्हा एकटेच प्रवास करीत असतो, तेव्हा ठीक आहे. पण, जेव्हा आपल्याबरोबर कुटुंबातील सदस्य किंवा लहान मुले असतात. तेव्हा मात्र आपल्याला अगदी सांभाळून गाडी चालवावी लागते. हे पाहून नियमांची पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याने बाईकवरून जाणाऱ्या बाबांना थांबवले आणि प्रेमाने समजावले. सिग्नलवर उपस्थित सगळेच जण हे दृश्य उत्सुकतेने पाहत असतात आणि जिथे मुली असतात, तिथे आनंद नक्कीच पसरतो, असे म्हणताना दिसतात.

व्हिडीओ नक्की बघा…

View this post on Instagram

A post shared by genzmediia (@genzmediia)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @genzmediia या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून पोलीस अधिकाऱ्याचे कौतुक करताना दिसत आहेत. “चिमुकलीला मागे बसवायला सांगून त्यांनी नियमांची आठवण करून दिली”, “असा आहे आमचा भारत”, “हीच तर माणुसकी आहे. खूप सुंदर. प्रिय भारतीयांनो, नियमांचे पालन करा”, “हे पोलीस अधिकारी आमच्या इकडचे आहेत”, “तर आपण मुलांच्या सुरक्षिततेबद्दल आणि त्यांच्या हेल्मेटबद्दल कधी बोलणार आहोत” आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.