गेल्या काही वर्षात लहान मुलांच्या शिक्षण पद्धतीत अनेक बदल झाले आहेत. लॉकडाउनमध्ये तर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षण, डिजिटल क्लासचा सुद्धा अनुभव घेतला आहे. तर आता विद्यार्थ्यांना अभ्यास लक्षात रहावा म्हणून आता थोडी मजा-मस्ती करतही त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला जातो. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. इथे काही विद्यार्थिनींना मुळाक्षरे आणि फळांची नावे शिवण्यासाठी अनोखी युक्ती वापरण्यात आली आहे.
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एकामागोमाग एक काही विद्यार्थिनी उभ्या आहेत. सगळ्या मुलींच्या हातात एक-एक फळ दिल आहे. विद्यार्थिनींना फळांची नावे लक्षात रहावी म्हणून एक गाणं तयार करण्यात आलं आहे. वाद्याच्या तालावर प्रत्येक विद्यार्थिनी तिच्या हातात असणाऱ्या फळाचे नाव सांगून गाण्याची ओळ म्हणताना दिसत आहे.
व्हिडीओ नक्की बघा :
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, पहिली विद्यार्थिनी सफरचंदाबद्दल सांगते. त्यानंतर दुसरी विद्यार्थिनी येऊन तिने हातात धरलेल्या फळाचे वर्णन करते. फळांच्या नावाचे हे खास गाणं वाद्याच्या ठेक्यावर विद्यार्थिनी सादर करत आहेत आणि उजळणी करताना दिसत आहेत. अशा खास पद्धतीत विद्यार्थीना शिकवलं जात आहे ; हे पाहून सोशल मीडियावर व्हिडीओचे खूप कौतुक होत आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @memenist_ या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून विविध शब्दात या गाण्याचं कौतुक करत आहेत. तसेच काही जण या व्हिडीओला एडिट करत यावर मिम्स सुद्धा बनवताना दिसत आहेत. एकंदरीतच या खास गाण्याने सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.