Viral Video: लहान मुले खूप निरागस असतात, त्यामुळे ती मुले आणि घरातील पाळीव प्राणी यांच्यात नेहमीच अनोखे नाते पाहायला मिळते. ते नेहमी प्राण्यांची खूप काळजी घेतात, त्यांना खायला देतात, त्यांच्याबरोबर स्वतःचा खाऊ शेअर करतात. या प्राण्यांच्या हालचालींकडे लहान मुलांचे खूप बारकाईने लक्ष असते. मागील काही दिवसांपूर्वीही असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यात एक लहान मुलगी घरातील पाळीव श्वानाबरोबर गेम खेळताना दिसत होती. पण, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका लहान मुलीचे श्वानाबरोबर क्यूट बॉन्डिंग पाहायला मिळत आहे.
श्वान हा अनेकांचा आवडता आणि खूप लाडका प्राणी आहे. श्वान खूप प्रामाणिक असल्यामुळे त्याच्यावर सर्वांचा विश्वास असतो. या पाळीव प्राण्याला अनेकदा घरातील इतर सदस्यांपेक्षाही उत्तम वागणूक दिली जाते. त्याची आवड-निवड पूर्ण केली जाते. हल्ली अनेक जण श्वानांचे वाढदिवसदेखील आवडीने साजरे करताना दिसतात. त्याशिवाय या लाडक्या प्राण्याचे घरातील अनेक मजेशीर किश्श्यांचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. आता असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही खूप हसू येईल.
काय घडले या व्हिडीओमध्ये? Viral Video
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहान मुलगी तिच्या कुटुंबीयांबरोबर फिरायला जात आहे, यावेळी ती तिच्याबरोबर घरातील पाळीव श्वानालादेखील घेते. पण, या चिमुकलीने त्या पाळीव श्वानाला स्वतःच्या कडेवर उचलून घेतल्याचे दिसत आहे, हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून नेटकरी अनेक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @yorkiemiix या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्यावर युजर्स अनेक कमेंट्स आणि लाइक्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास लाखो व्ह्यूज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर एकाने लिहिलेय, “ते पिल्लू आहे खेळणं नाही”, आणखी एकाने लिहिलेय, “ही लहान मुलं असं काही करतात तेव्हा त्यांचे आई-वडील कुठे असतात”, आणखी एकाने लिहिलेय, “बिचारा श्वान.”
पाहा व्हिडीओ:
दरम्यान, यापूर्वीदेखील प्राण्यांचे असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यात कधी ते लहान मुलांसोबत खेळताना, तर कधी त्यांच्यासोबत पूजा करताना दिसतात. अशा व्हिडीओंना नेटकऱ्यांकडूनही पसंती मिळत असते.