Viral dance video: परिस्थिती भाग पाडते नाहीतर कला जोपासला कोणाला नाही आवडणार. सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातले काही व्हिडीओ हसवतात, काही व्हिडीओ रडतात तर काही विचार करायला भाग पाडतात. असाच एक सपाई कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सफाई कर्मचाऱ्याला परिस्थितीमुळे हे काम करावं लागत आहे मात्र तरीही त्याच्यातलं खरं टॅलेंट काही लपत नाहीये. याचा व्हिडीओ पाहून तु्म्हीही त्याचं कौतुक कराल..

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता हा कर्मचारी कचरा गोळा करण्यासाठी आला असता, गाणं लागताच तो गाण्याच्या तालावर थिरकू लागलाय. त्याच्या एकापेक्षा एक डान्स स्टेप पाहून बघणारेही शॉक झाले.

सर्वसामान्य कुटुंबातील अनेक तरुणांना परिस्थितीमुळे त्यांची स्वप्न बाजूला ठेवावी लागतात. कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर पडल्यामुळे काही स्वप्न ही स्वप्नच राहतात. याच धावपळीत अनेकांनी आपली आवड, कलाही जोपसता येत नाही. मात्र मलप्पुरमचा सफाई कर्मचारी रघु वरण सोशल मीडियावर चांगलाच झळकत आहे. ऑन ड्युटी असताना रघुनं केलेल्या डान्सचं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Shocking video: मगरीला मेलेलं समजून फोटो काढण्यासाठी गेले अन्…पुढे जे झालं ते हादरवणारं..!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज गेले आहेत. यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @raghuvaran___leo_58 या पेवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.