प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणती ना कोणती कला दडलेली असते. या कलेला अगदी लहानपणापासून काही जण विविध रंगांनी, रूपांनी आकार देत असतात, तर काही कला व्यक्ती स्वत: आत्मसात करतात. अनेकदा या कला व्यक्तीला अशी काही ओळख निर्माण करून देतात ज्याचा त्यांनी कधी विचारही केला नसेल. कलाकाराला त्याच्या कलेमुळे मिळणारे समाधान फार मोठे असते, जे बघणाऱ्या रसिकाच्या मनालाही आनंद देऊन जाते. आता हा व्हायरल व्हिडीओच पाहा ना! या व्हिडीओमध्ये एक महिला रस्त्यावर आपली अशी एक कला सादर करते आणि अनेकांची मने जिंकते.
चित्रकलेची आवड असणाऱ्या या महिलेने रस्त्यावर असे एक चित्र साकारले आहे, जे पाहून तुमचाही काही वेळ विश्वास बसणार नाही ते खरेच चित्र आहे. महिलेच्या या चित्राची जादू अनेकांना आवडली आहे.
चित्रकला ही अशी एक कला आहे, तीद्वारे व्यक्तीच्या भावभावना अगदी हुबेहूब चित्राच्या माध्यमातून रेखाटता येतात. शिवाय अशक्य गोष्टी चित्रातून शक्य करून दाखवता येतात. या महिलेनेही आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून सर्वांची मने जिंकली आहेत.
व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एका महिलेने रस्त्यावर एक सुंदर थ्रीडी पेंटिंग रेखाटले, ज्यात एक बांधकाम केलेला पूल तिने हुबेहूब रेखाटला, हा रेखाटलेला पूल एका खऱ्या पुलाप्रमाणे दिसतोय. तिने काढलेल्या पुलाच्या चित्रावरून जेव्हा एक लहान मुलगी धावत येते तेव्हा तो खरोखरच एक पूल असल्याचे भासते. काळा आणि पांढरा असे दोन रंग वापरून तिने पुलाचे चित्र रेखाटले आहे. जे आता अनेकांना फार आवडले आहे. तिची ही कला सर्वांनाच थक्क करणारी आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आता ही महिला चित्रकार चर्चेचा विषय ठरली आहे.
येथे पाहा हा व्हिडीओ
हा व्हिडीओ महिलेने @punamartacademy या इन्स्टाग्राम अकाउंट वर शेअर केला आहे. या व्हिडीओला ३.२ मिलियन व्ह्यूज तर हजारोंमध्ये लाईक मिळाले आहेत. तसेच अनेक नेटकऱ्यांनी महिलेच्या या अप्रतिम कलेचे कौतुक करून, तिच्या कलेला सलाम केला आहे.