वसई : दिल्लीतून आलिशान वाहनांची चोरी करून त्यांची देशभरात विक्री करणार्‍या एका टोळीला मध्यवर्ती गुन्हे शाखेने अटक केली आहे. वाहनांचे इंजिन, चेसिस क्रमांक तसेच नोंदणी क्रमांक बदलले जात असल्याने या चोरीचा छडा लागत नव्हता. मात्र पोलिसांनी तांत्रिक तपास करून हे प्रकरण उघडकीस आणले. या टोळीकडून चोरी केलेल्या ८ आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत

आलिशान वाहनांची चोरी करून त्या वाहनांचा नोंदणी क्रमांक, इंजिन आणि चेसीस क्रमांक बदलून त्यांची विक्री केली जात असल्याची माहिती मध्यवर्ती गुन्हे शाखेला मिळाली होती. याप्रकरणी एका प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. या प्रकरणाी पोलिसांनी तांत्रिक तपास करून एका टोळीतील ६ जणांना अटक केली. मिलनराजसिंह ऊर्फ बापु चौहाण(३५ ),गरीफहुसेन खान (३३ ),ईर्शाद अजमेरी (३९), वसीम पठाण (३७ ), शाहीद खान (३४) नबीजान ऊर्फ शौकतअली अन्सारी (४७ ) अशी या आरोपींची नावे आहे. या टोळीकडून पोलिसांनी चोरी केलीली ८ वाहने जप्त केली त्याची किंमत अडीच कोटींहूनअधिक आहेत. आरोपींविरोधात दिल्लीतील विविध पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा : वसई : पालिका मुख्यालयाचे उद्घाटन लांबणीवर, फर्निचर आणि साहित्य गंजू लागले

पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल लाख, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितिन बेंद्रे, पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे आणि त्यांच्या पथकाने या टोळीचा छडा लावून त्यांना अटक करण्यात यश मिळवले.

हेही वाचा : हिंदू स्मशानभूमीत मांजरांचे दहन, खासगी संस्थेसह स्मशानभूमीतील कर्मचार्‍यांवर गुन्हे दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असा लावला छडा

हे आरोपी प्रामुख्याने दिल्लीतून वाहनांची चोरी करायचे आणि त्यांच्या इंजिन तसेच चेसीस क्रमांकात बदल करायचे. वाहनांचा नोंदणी क्रमांक बदलून नंतर त्या गाड्यांची विक्री करत होते. त्यामुळे चोरीला गेलेल्या वाहनांचा तपास लावणे कठीण झाले होते. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात गुगल ट्रॅकींग सिस्टीमचा वापर करून गाडीचा मूळ क्रमांक शोधून काढला. टोयाटो, हुंडाई आदी कंपनीशी संपर्क केल्यानंतर वाहनाचा नोंदणी क्रमांक,चेसीस व इंजिन क्रमांक बदलण्यात आल्याचे आढळून आले.ही टोळी गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेश अश्या राज्यात सक्रिय असल्याचे पोलिसांनी सांगितले.