रत्नागिरी जिल्ह्य़ात शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या भैयाजी काणे यांच्या वाचनात ईशान्य भारतातील परिस्थिती आली. शिक्षणाद्वारे राष्ट्रीय एकात्मता साधता येणे शक्य आहे, यावर त्यांचा विश्वास होता. त्यामुळे १९७१ मध्ये मणिपूरमध्ये भैयाजी दाखल झाले. तिथे त्यांनी एका शाळेत शिक्षक म्हणून नोकरी पत्करली. दरम्यानच्या काळात सर्व प्रदेश पालथा घालून स्थानिक परिस्थितीचा बारकाईने अभ्यास केला. त्यातूनच पुढे १९८६ मध्ये पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना झाली..

भारताच्या ईशान्य भागातील आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालॅण्ड, मणिपूर, त्रिपुरा आणि मिझोराम ही सात राज्य. नैसर्गिक सौंदर्याने अतिशय श्रीमंत असलेला हा प्रदेश स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या मुख्य प्रवाहापासून विविध कारणांमुळे वंचित राहिला. डोंगरदऱ्या, घनदाट जंगले, चार-पाच महिने भरपूर पाऊस या नैसर्गिक परिस्थितीमुळे या परिसरात विकास योजना राबविताना अडचणी आल्या. पायाभूत सुविधांचा अभाव, दारिद्रय़, भ्रष्टाचार, बेरोजगारी, वर्णभेद आदी कारणांमुळे आलेल्या नैराश्यामुळे स्वतंत्र भारताशी आपले काही देणेघेणे नाही, अशी भावना या प्रदेशातील रहिवाशांमध्ये वाढीस लागली. तिन्ही बाजूंनी आंतरराष्ट्रीय सीमांनी वेढलेल्या या प्रदेशात त्यामुळे जाणीवपूर्वक फुटीरतावादाची बीजे रोवली गेली. येथील असंतुष्ट तरुण पिढीला हाताशी धरून शेजारील राष्ट्रांनी त्यांच्या असंतोषाला खतपाणी घालण्यास सुरुवात केली. भारतीय नागरिक आणि भारतीय संस्कृतीविषयी त्यांच्या मनात जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण केले गेले. ईशान्य भारतामध्ये तस्करी आणि तिरस्काराचे तण माजले. परिणामी अनेक दहशतवादी संघटनांनी या राज्यांमध्ये बस्तान मांडले. चिकन नेक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केवळ एका चिंचोळ्या पट्टय़ाने भारताशी जोडल्या गेलेल्या या निसर्गसंपन्न प्रांतातील राष्ट्रीयत्वाची भावनाच त्यामुळे पणाला लागली. शत्रूंनी थेट गळ्याभोवतीच फास आवळायला सुरुवात केली. देशाच्या सीमांचे संरक्षण करण्याबरोबरच सीमावर्ती प्रदेशातील जनतेमध्ये विश्वास आणि सौदार्हाचे वातावरण निर्माण करणे तितकेच महत्त्वाचे असते. रस्ते, पूल आदी दळणवळणाची साधने, पायाभूत सुविधा, शिक्षण, रोजगार तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक आदानप्रदानाने हे शक्य होऊ शकेल. केवळ लष्करी बळाने नाही. सर्वसामान्य भारतीयांनीही त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. शत्रूंचा प्रभाव कमी करायचा असेल तर या भागात अधिकाधिक मित्र जोडणे आवश्यक आहे, हे चार दशकांपूर्वी महाराष्ट्रातील एका द्रष्टय़ा शिक्षकाने ओळखले. त्यांचे नाव शंकर दिनकर ऊर्फ भैयाजी काणे. रत्नागिरी जिल्ह्य़ात शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या भैयाजी काणे यांच्या वाचनात ईशान्य भारतामधील या सीमावर्ती भागातील परिस्थिती आली. शिक्षणाद्वारे राष्ट्रीय एकात्मता साधता येणे शक्य आहे, यावर त्यांचा विश्वास होता. त्यामुळे १९७१ मध्ये नितांतसुंदर मणिपूरमध्ये भैयाजी दाखल झाले. तिथे त्यांनी  एका शाळेत शिक्षक म्हणून नोकरी पत्करली. दरम्यानच्या काळात तेथील सर्व प्रदेश पालथा घालून स्थानिक परिस्थितीचा बारकाईने अभ्यास केला. त्यानंतर एकात्म आणि एकसंध राष्ट्रनिर्मितीसाठी या प्रदेशात अविरत कार्य करण्याचा त्यांनी निर्धार केला. आपण आज एक चांगले रोप लावू या, त्याला उद्या निश्चितच चांगली फळे येतील, हा विश्वास त्यांच्या कृतीमागे होता. त्यातूनच पुढे १९८६ मध्ये पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना झाली. वाईट आणि घातक प्रवृत्तींचे प्राबल्य कमी करायचे असेल तर सद्विचारांचा प्रभाव वाढवायला हवा, हा विचार त्यामागे होता.

Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
Parakala Prabhakar criticism of the government development work Pune news
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीचे सरकारवर टीकास्र, म्हणाले, ‘विकास होत असल्याचे दाखवण्याची सरकारला घाई’
Girish Bapat photograph
धंगेकरांच्या प्रचारासाठी गिरीश बापट यांच्या छायाचित्राचा वापर? छायाचित्र वापरण्यास बापट यांच्या चिरंजीवांचा आक्षेप
Beed Lok Sabha
बीडमध्ये मराठा ध्रुवीकरणाचा शरद पवारांचा प्रयोग

प्रार्थनास्थळे आणि शाळांच्या माध्यमातून परकीय मिशनऱ्यांनी या प्रदेशात स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रभाव प्रस्थापित केला आहे. मिशनऱ्यांच्या या कार्यपद्धतीला शह देण्यासाठी ठोस आणि सकारात्मक  कामाची आवश्यकता होती. भारतीय समाजातील संवेदनशील व्यक्तींनी या भागात समांतररीत्या सेवाभावी चळवळीचे जाळे निर्माण करणे आवश्यक आहे. सेवा, शिक्षण आणि आरोग्य सेवांद्वारेच या मिशनऱ्यांच्या कार्याला पर्याय देता येऊ शकेल, या विचाराने भैयाजी काणे यांनी या भागात कार्य सुरू केले. त्यासाठी त्यांनी नव्या पिढीवर लक्ष केंद्रित केले. कारण लहान मुले निरागस असतात. त्यांच्या मनात कोणतेही पूर्वग्रह नसतात. त्यामुळे त्यांच्यावर योग्य संस्कार केले तर येथे भविष्यात भारतीयत्वाची भावना वाढेल ही दूरदृष्टी भैयाजींच्या कामामागे होती. योग्य शिक्षणातून परिवर्तन घडेल, यावर त्यांचा विश्वास होता. ज्या भारताविषयी शत्रुत्वाची भावना त्यांच्या मनात जाणीवपूर्वक रुजवली जाते, तो भारत, तेथील जनता प्रत्यक्षात कशी आहे, हे त्यांना अनुभवता यावे, यासाठी त्यांनी विद्यार्थी आदानप्रदान योजना राबवली. त्याद्वारे मणिपूरच्या विद्यार्थ्यांना भारतातील विविध प्रांतांत शिक्षणासाठी आणण्यास सुरुवात केली. सुरुवातीला पालकांनी इतक्या दूरवर मुलांना शिक्षणासाठी पाठविण्यास असमर्थता व्यक्त केली. तेव्हा आपल्या सोबत असलेल्या कोकणातील शाळेतील जयवंत कोंडविलकर याला त्यांनी त्यांच्या सुपूर्द केले.

ईशान्य सीमेवरील संवाद सेतूला मदतीची गरज

जयवंत मणिपूरमधील शाळेत शिकेल. तुमच्यासोबत राहील, याची त्यांनी त्यांना ग्वाही दिली. एका अर्थाने एक महाराष्ट्रीय मुलगा अक्षरश: ओलीस ठेवून या योजनेची सुरुवात झाली. भैयांजींवरील प्रेम, आदर आणि विश्वासापोटी कोकणातील राजापूर तालुक्यातील जुवाठी या एका लहानशा खेडय़ातील जयवंत हा अवघा दहा-बारा वर्षांचा मुलगा न्यू तुसोम या म्यानमारच्या सीमेवरील गावात राहिला. त्या अनोळखी प्रदेशात स्थानिक मुलांसोबत तिथल्या शाळेत शिकला. त्यामुळेच मणिपूरमधील पालकांच्या मनात भैयाजी आणि त्यांच्या कार्याविषयी विश्वास निर्माण झाला. परिणामी या योजनेने चांगले मूळ धरले. महाराष्ट्रात शिकून पुन्हा मणिपूरमध्ये परतलेल्या मुलांनी आतापर्यंत ‘ऐकीव’ असलेल्या भारतापेक्षा प्रत्यक्षातला भारत वेगळा आहे. तेथील माणसे प्रेमळ आहेत, हे आपल्या पालकांना तसेच गावातील इतरांना सांगण्यास सुरुवात केली. त्या प्रदेशात भैयांजींविषयी आदरभाव वाढू लागला. ते त्यांना ओजा म्हणजे गुरू मानू लागले. दरम्यानच्या काळात जयवंतनेही तिथेच राहून आपले शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्याने तेथील भाषा आत्मसात केली. स्वकीयांचे दुर्लक्ष आणि परकीयांचा अपप्रचार यामुळे भारताला शत्रू मानणाऱ्या या प्रदेशात मित्रांची संख्या वाढविण्यात भय्याजी काणे आणि जयवंत कोंडविलकर या गुरूशिष्यांची ही चळवळ खूपच उपयोगी ठरली. जयवंतच्या रूपाने प्रतिष्ठानला निष्ठावान आणि मेहनती कार्यकर्ता मिळाला. सचिव आणि विश्वस्त या नात्याने जयवंत कोंडविलकर अजूनही प्रतिष्ठानच्या सर्व उपक्रमात कार्यरत आहेत. महाराष्ट्रात चिपळूण आणि डोंबिवली येथे प्रतिष्ठानची वसतिगृहे आहेत. चिपळूणच्या वसतिगृहात मुलींची तर डोंबिवलीत मुलांची व्यवस्था केली जाते. वसतिगृहात राहून ही मुले स्थानिक शाळांमध्ये शिकतात. गेल्या काही वर्षांत या उपक्रमाद्वारे शेकडो मुले-मुली महाराष्ट्रातून शालेय शिक्षण घेऊन गेले आहेत. सध्या चिपळूणच्या वसतिगृहात १२ मुली तर डोंबिवलीच्या वसतिगृहात १८ मुले आहेत. इथे त्यांना प्रतिष्ठानतर्फे शालेय शिक्षण तसेच निवासाची व्यवस्था विनामूल्य उपलब्ध करून दिली जाते.

यासाठी हवी आहे मदत

ईशान्य भारतात राष्ट्रीय एकात्मता रुजविण्याच्या या कार्याचे व्यवस्थापन आणि विस्तारासाठी प्रतिष्ठानला मोठय़ा प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. प्रत्येक भारतीय आपापल्या कुवतीप्रमाणे या देशकार्यात योगदान देऊ शकतो. प्रतिष्ठानच्या तिन्ही शाळा विनाअनुदानित आहेत. वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्यांचा वार्षिक खर्च २० हजार रुपये आहे. अनिवासी विद्यार्थ्यांचा वार्षिक खर्च दहा हजार रुपये आहे. या विद्यार्थी दत्तक योजनेबरोबरच संस्थेला इमारत उभारणी, वाचनालय, प्रयोगशाळा, संस्थेचा वार्षिक उत्सव, व्यवसाय मार्गदर्शन, शैक्षणिक तसेच आरोग्यविषयक शिबिरे, सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प, शालेय साहित्य आणि वर्गातील फर्निचर व्यवस्था, क्रीडा साहित्य आदींसाठी निधीची चणचण भासते आहे.

भविष्यातील उपक्रम आणि आव्हाने 

मणिपूरमधील तिन्ही शाळांमध्ये किमान दहावीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रतिष्ठानचा प्रयत्न आहे. कारण त्यामुळे सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया वेगाने होत असल्याचे दिसून येत आहे. या शाळा पूर्णपणे विनाअनुदानित तत्त्वावर चालविल्या जातात. भारत-म्यानमार सीमेवरील प्रदेशातील वाढती घुसखोरी आणि दुर्गमता यामुळे या प्रदेशातील शाळांचे व्यवस्थापन हे प्रतिष्ठानच्या पुढील मोठे आव्हान आहे.

  • प्रतिष्ठानतर्फे गावांमध्ये साक्षरता अभियान, विद्यार्थी-पालक मेळावे भरविले जातात. नियमितपणे आरोग्य शिबिरे तसेच व्यवसाय मार्गदर्शन शिबिरे भरविली जातात.
  • २६ ऑक्टोबर या भैयाजी काणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त निरनिराळे कार्यक्रम आयोजित केले जातात.
  • स्थानिकांना वनशेती, औषधी वनस्पतींची लागवडीचे प्रयोग रुजविण्याचा प्रयत्न केले जातात.

पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान डोंबिवली

इंग्रजी, गणित आणि विज्ञान शिकविणाऱ्या शिक्षकांनी आपल्या आयुष्यातील काही काळ येथील शाळांना द्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानने केले आहे. त्यातही महिलांना प्राधान्य दिले जाईल, कारण हा सर्व प्रदेश मातृसत्ताक आहे. शैक्षणिक आदानप्रदान योजना पदवीपर्यंत विस्तारण्याचा प्रतिष्ठानचा प्रयत्न आहे.

संस्थेपर्यंत कसे जाल?

ओजा शंकर विद्यालय, खरासोम, जिल्हा-उख्रुल, मणिपूर. मुंबई ते क ोलकाता व तेथून दिमापूर रेल्वे सेवा आहे. दिमापूर ते इम्फाळ हा सात तासांचा प्रवास बसने करता येतो. इम्फाळहून खरासोम हे अंतर १६० किलोमीटर इतके असून त्यासाठी आठ तास लागतात.

धनादेश या नावाने पाठवा..

पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान

(Purv Seema Vikas Pratishthan)

(कलम ८०जी (५) नुसार देणग्या करसवलतीस पात्र आहेत)

धनादेश येथे पाठवा.. : एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे लोकसत्ता प्रसिद्ध केली जातील.

  • मुंबई कार्यालय

लोकसत्ता, संपादकीय विभाग, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०५३६

  • महापे कार्यालय

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००

  • ठाणे कार्यालय

संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३८५१३२

  • पुणे कार्यालय

संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४.  ०२०-६७२४११२५

  • नाशिक कार्यालय

संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१.  ०२५३-२३१०४४४

  • नागपूर कार्यालय

संपादकीय विभाग, प्लॉट नं. १९, ग्रेट नागरोड, उंटखाना, नागपूर – ४४०००९, ०७१२ झ्र् २७०६९२३

  • औरंगाबाद कार्यालय

संपादकीय विभाग, १०३, गोमटेश मार्केट, गुलमंडी, औरंगाबाद. दूरध्वनी क्रमांक ०२४०-२३४६३०३, २३४८३०३

  • नगर कार्यालय

संपादकीय विभाग, १६६, अंबर प्लाझा, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१-२४५१५४४/२४५१९०७

  • दिल्ली कार्यालय

संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा – २०१३० उत्तर प्रदेश. ०११- २०६६५१५००