कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर सवंग लोकप्रियतेसाठी राजकीय द्वेषापोटी आरोप करणाऱ्या खासदार राजू शेट्टी यांचा राष्ट्रवादी किसान सभेच्या वतीने पत्रकाद्वारे निषेध करण्यात आला. शेतकऱ्यांच्या नेत्यावर टीका करणाऱ्यांना जशास तसे उत्तर किसान सभा देईल, असा इशारा दिला आहे.
पत्रकात म्हटले आहे, की कृषिमंत्री पवार ५० वर्षे राजकारण व समाजकारणात असून महाराष्ट्रात अभ्यासू नेते म्हणून कार्यरत आहेत. शेतकऱ्यांसाठी झटणारे नेतृत्व म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो.  भाजप, एनडीए राजवटीत काळात जे शेतीमालाचे दर होते. त्यापेक्षा गेल्या दहा वर्षांत कृषिमंत्री पवार यांनी शेतीमालाचे दर टप्प्याटप्प्यांनी चौपटीपर्यंत वाढविले. त्यातून शेतकऱ्यांचे हित साधले. पवार यांच्या काळात देश शेतीमाल उत्पन्नात स्वयंपूर्ण झाला आहे. शेतकऱ्यांचा नेता समजणाऱ्यांनी मताच्या राजकारणासाठी आमच्या नेत्यांवर उगाच टीका करू नये, या वेळी जिल्हाध्यक्ष रावसाहेब ऐतवडे, कार्याध्यक्ष चंद्रकांत मोरे, राष्ट्रवादीचे ग्रामीण उपाध्यक्ष जयकुमार िशदे, बी. के. डोंगळे, बाळासाहेब देसाई, सागर पाटील, गजानन मांजरे, भास्कर शेटे आदी राष्ट्रवादी किसान सभेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.