बॉलीवूड अभिनेता आमिर खानने ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान शाहरुख खानबरोबरच्या मैत्रीबद्दल वक्तव्य केलं आहे. आमिरने जुन्या आठवणींना उजाळा देत शाहरुखला फार ओळखत नसल्याचं सांगितलं. शाहरुखने एकदा आमिरला छिछोरा म्हटलं होतं, त्यावर आमिरने सकारात्मक प्रतिक्रिया दिली. आमिर, शाहरुख आणि सलमान खान चांगल्या संहितेच्या शोधात असल्याचंही त्याने सांगितलं.